Guava Pickle Recipe: लोणचं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटतं. आपल्याकडे प्रामुख्याने कैरी आणि लिंबाचं लोणचं मोठ्या प्रमाणात बनवलं जातं. पण, हळूहळू महिला विविध प्रकारची लोणची बनवताना दिसतात. ज्यात मिरची, करवंद, गाजर यांसारख्या लोणच्यांचा समावेश असतो; त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पेरुचं लोणचं कसं बनवायचं हे सांगणार आहोत.

पेरुचं लोणचं बनवण्यासाठी साहित्य:

१. ३ मोठ्या आकाराचे पेरु
२. २ वाटी गुळाचे तुकडे
३. २ चमचे लाल मिरची पावडर
४. २ चमचे हळद पावडर
५. १ चमचे जिरं
६. चवीनुसार मीठ
७. तेल

पेरुचं लोणचं बनवण्यासाठी कृती:

१. सर्वप्रथम पेरुचे लहान तुकडे करून घ्या आणि कढईत तेल गरम करा.

२. त्यानंतर त्यात जिरे घाला व काही वेळाने त्यात पेरुचे तुकडे घालून परता.

३. आता त्यात हळद, लाल तिखट चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परतून घ्या.

४. त्यानंतर त्यात गूळ मिक्स करावा आणि तो वितळेपर्यंत परतत राहा.

५. पेरु शिजेपर्यंत ५ मिनिटे तरी लागतील.

६. काही मिनिटांनंतर गूळ वितळला आहे का ते एकदा तपासून घ्या.

हेही वाचा: बाजारातील चिप्सऐवजी मुलांसाठी घरीच बनवा ‘नाचणीचे पौष्टिक चिप्स’; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

७. गूळ पूर्णपणे वितळला की लोणचं तयार झालं.

८. गॅस बंद करून पेरुचं लोणचं गार करा आणि एका काचेच्या भरणीत भरून ठेवा.