Makhana Basundi: मखाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मखाणा खाण्यास चविष्ट तर असतोच, शिवाय तो शरीरासाठीही फायदेशीर आहे. मखाण्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे, खनिजे, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह आणि फॉस्फरसदेखील मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे यापासून विविध पदार्थदेखील बनवले जातात. तसेच मखाणा उपवासतही खाल्ला जातो. उपवासाच्या दिवसात मखाणा खाल्ल्याने थकवा जाणवत नाही. दरम्यान, आज आम्ही तुम्हाला मखाण्याची बासुंदी कशी बनवायची हे सांगणार आहोत.
मखाण्याची बासुंदी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप मखाने
- २ चमचे तूप
- १ लीटर दूध
- १ चमचा वेलची पूड
- १/२ वाटी काजू-बदाम
- ७-८ केशराच्या काड्या
मखाण्याची बासुंदी बनवण्याची कृती:
हेही वाचा: उपवासासाठी खास साबुदाण्याची बर्फी; एकदम सोपी रेसिपी
- सर्वप्रथम दूध नॉनस्टिक पॅनमध्ये मंद आचेवर गरम करायला ठेवा आणि दूध अर्धे होईपर्यंत उकळवून घ्या.
- दुसरीकडे कढईत तूप घालून मखाणे कुरकरीत होईपर्यंत ३-४ मिनिट भाजून घ्या.
- आटलेल्या दूधात साखर, केशराच्या काड्या, वेलची पावडर, काजू-बदाम आणि भाजलेले मखाणे मिक्स करा.
- आता काही वेळ पुन्हा दूधाला उकळी येऊ द्या.
- दूध जाडसर झाल्यावर गॅस बंद करून मखाणा बासुंदीचा आस्वाद घ्या.