Egg Paratha Recipe: ओट्स पराठा, व्हेज पराठा आजपर्यंत तुम्ही अनेकदा ट्राय केला असेल. पण आज आम्ही तुम्हाला अंडा पराठा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साहित्य आणि कृती…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अंड पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ५-६ अंडी
  • ३ वाटी गव्हाचे पीठ
  • २ बारीक चिरलेला कांदा
  • २ बारीक चिरलेले टोमॅटो
  • २ चमचे लाल तिखट
  • ५-६ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

अंड पराठा बनवण्याची कृती:

हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा टेस्टी आणि हेल्दी रव्याचा मेदूवडा; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम अंडी व्यवस्थित फेटून घ्या आणि फेटलेल्या अंड्यात, कांदा, टोमॅटो, मिरची, लाल तिखट आणि चवीनूसार मीठ घाला.
  • आता दुसरीकडे गव्हाच्या पीठाच्या लहान पोळ्या तयार करून घ्या.
  • आता गॅसवर तवा ठेवून त्यावर पोळी भाजा. त्यानंतर तयार अंड्याचे मिश्रण तेलासारखे पोळीवर लावून घ्या. त्यावर दुसरी पोळी ठेवून हलक्या हाताने दाबून घ्या.
  • एक-दोन मिनिटांनी अंडा पराठा उलटून घ्या आणि बाजूने चमचाभर तेल सोडा.
  • तयार गरमागरम अंड पराठा सॉसबरोबर सर्व्ह करा.