Rice Thalipeeth Recipe: आजपर्यंत तुम्ही नाचणीचे, बाजरीचे किंवा मिक्स पीठांचे थालीपीठ खाल्ले असेल. पण आज आम्ही तुम्हाला तांदळाचे थालीपीठ कसे बनवायचे हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला जितकी सोपी तितकीच खायला खूप चविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया तांदळाच्या थालीपीठाची सोपी रेसिपी..

तांदळाचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी तांदळाचे पीठ
  • १ बारीक चिरलेला कांदा
  • ३ चमचे बेसन
  • १ वाटी ओलं खोबरं
  • २ चमचे दही
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • १ वाटी कोथिंबीर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार
  • तूप आवश्यकतेनुसार

तांदळाचे थालीपीठ बनवण्याची कृती:

हेही वाचा: मुलांच्या डब्यासाठी झटपट बनवा दुधी मसाला फ्रायची सोपी रेसिपी; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वात आधी ओलं खोबरं, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वाटून त्यात घ्या.
  • त्यानंतर एका भांड्यात तांदळाचे पीठ, बेसन, कांदा, दही, बारीक वाटून घेतलेले ओलं खोबऱ्याचे मिश्रण एकजीव करून घ्या.
  • या मिश्रणात तेल मिक्स करून गरज असल्यास तर थोडे पाणी घाला.
  • आता या मिश्रणाचे थालीपीठ थापून ते भाजण्यासाठी तव्यात टाकून त्यावर तूप सोडून ते झाकून ठेवा.
  • थालीपीठ दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.
  • गरमागरम थालीपीठ तयार झाल्यावर दह्याबरोबर त्याचा आस्वाद घ्या.