Aloo Bhujia Recipe: दिवाळीच्या दिवसात विविध पदार्थ बनवले जातात. पण, हल्ली काहीजण बाहेरूनच फराळ मागवतात. अशावेळी तुम्ही घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत आणि कमी वेळेत आलू भुजिया नक्कीच बनवू शकता. चला तर मग जाणून घ्या आलू भुजिया बनवण्याची सोपी रेसिपी

आलू भुजिया बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • ४-५ उकडलेले बटाटे
  • ४ चमचे बेसन
  • लाल तिखट आवश्यकतेनुसार
  • १ चमचे हळद
  • बेकिंग सोडा चिमूटभर
  • मीठ चवीनुसार
  • तेल आवश्यकतेनुसार

आलू भुजिया बनवण्याची कृती:

हेही वाचा: दिवाळीतील मिठाई कधी संपणार, असा प्रश्न पडलाय? मग झटपट बनवा मिठाईची स्वादिष्ट खीर

  • सर्वात आधी बटाटे उकडून ते थंड झाल्यावर त्याची साल काढून एका भांडयात कुस्करून घ्या.
  • आता त्यात बेसन मिक्स करा.
  • त्यानंतर या मिश्रणात लाल तिखट, हळद, चिमूटभर बेकिंग सोडा आणि चवीनुसार मीठ एकजीव करून घ्या.
  • आता या मिश्रणात पाणी आणि थोडसं तेल घालून पीठ मळून घ्या.
  • त्यानंतर मळलेले पीठ १५ मिनिटांसाठी झाकून ठेवा.
  • गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करण्यास ठेवा आणि बनवलेले पीठ शेवच्या साच्यात भरून साच्याच्या साहाय्याने तेलात शेव पाडा.
  • ही शेव सोनेरी होईपर्यत तळून घ्या.
  • तयार शेववर अर्धा चमचा लिंबू पिळून आलू भुजियाचा आस्वाद घ्या.