Rava Medu Vada: उडदाच्या वड्याचा मेदूवडा तुम्ही आतापर्यंत नक्की ट्राय केला असेल पण, आज आम्ही तुम्हाला रव्याचा पौष्टिक मेदूवडा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोपी रव्याच्या मेदूवड्याची रेसिपी
रव्याचा मेदूवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ कप रवा
- ३-४ कप दही
- १ चमचा किसलेलं आलं
- ३-४ हिरव्या मिरच्या
- तेल
- मीठ
रव्याचा मेदूवडा बनवण्याची कृती:
हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
- एका बाऊलमध्ये रवा आणि दही मिक्स करून तयार मिश्रणात आलं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चवीनुसार मीठ घालून त्याची जाड पेस्ट बनवून घ्या.
- तयार मिश्रण १५-२० मिनिटांसाठी झाकून ठेवा.
- त्यानंतर एका कढईत तेल गरम करून वडे तयार करा आणि त्याला मधोमध एक छेद करून घ्या.
- तयार वडे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तेलात तळून घ्या.
- रव्याचा गरमागरम कुरकरीत मेदूवडा नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करा.