Matar paratha recipe: मुलं अनेकदा मटारची भाजी खायला कंटाळा करतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी मटार पराठ्याची सोपी रेसिपी घेऊन आलो आहोत. नाश्त्यासाठी देखील हा उत्तम पर्याय आहे, शिवाय हा पराठा पौष्टिक असून मुलं आवडीने खातील. चला तर मग जाणून घेऊया मटार पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती…

मटार पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २०० ग्रॅम उकडलेले मटार
  • १/२ कप बटाटे उकडलेले
  • १ कोबी बारीक चिरलेली
  • १ कप गाजर किसलेले
  • १ कांदा बारीक चिरलेला
  • १ किसलेले आलं
  • १ चमचा लाल मिरची.
  • तेल आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार

मटार पराठा बनवण्याची कृती:

हेही वाचा: मुलांसाठी आवर्जून बनवा नाचणीची पौष्टिक वडी; वाचा साहित्य आणि कृती

  • सर्वप्रथम गॅसवर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात मटार, बटाटा, फ्लॉवर, गाजर, कोबी टाकून मध्यम आचेवर शिजवून घ्या.
  • त्यानंतर चाळणीच्या साहाय्याने भाजीचे पाणी वेगळे करा.
  • आता एका परातीत गव्हाचे पीठ घ्या आणि या पीठात उकडलेल्या सर्व भाज्या स्मॅश करून घ्या.
  • आता या मिश्रणात कांदा, मिरची लाल तिखट, जिरे, चवीनुसार मीठ घालून चांगले मिक्स करा आणि थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.
  • मळलेल्या पीठाचे पराठे बनवून घ्या.
  • आता गॅसवर तवा मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा आणि तवा गरम झाल्यावर त्यात थोडं तेल टाकून सगळीकडे पसरवा.
  • तव्यावर पराठा टाकून दोन्ही भाजून तेल लावून खरपूस भाजून घ्या.
  • तयार गरमागरम मटार पराठा दह्यासोबत किंवा सॉससोबत सर्व्ह करा.

Story img Loader