Matar Puri recipe: पालक पुरी, मेथी पुरी आतापर्यंत तुम्ही बऱ्याचदा खाल्ली असेल. पण, आज आम्ही तुम्हाला मटार पुरी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही रेसिपी बनवायला जेवढी सोपी तेवढीच खायला चविष्ट आहे. चला तर मग जाणून घेऊया मटार पुरीची सोपी रेसिपी
मटार पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य:
- २ वाटी मटार
- ३ चमचे रवा
- ५-६ हिरव्या मिरच्या
- आल्याचा लहान तुकडा
- १ वाटी कोथिंबीर
- १ चमचा जिरे
- १/२ चमचा धणे
- १ चमचा बडिशेप
- १/२ चमचा ओवा
- तेल आवश्यकतेनुसार
मटार पुरी बनवण्याची कृती:
हेही वाचा: दोन वाटी मूग वापरून बनवा हेल्दी मूग डोसा; पटकन वाचा सोपी रेसिपी
- सर्वप्रथम खलबत्यामध्ये जिरे, धणे, बडिशेप, ओवा बारीक करून घ्या.
- आता दुसरीकडे वरील खलबत्यातील मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, मटार आणि पाणी टाकून मिक्सरमध्ये पुन्हा बारीक करून घ्यावे.
- तोपर्यंत एका ताटात मीठ, हळद, कणिक, रवा आणि बारीक केलेले मसाले घालून पीठ मळून घ्या.
- जवळपास २० ते ३० मिनिटांनंतर पिठाच्या लहान लहान पुऱ्या तयार करून घ्याव्यात.
- या तयार पुऱ्या गरम तेलात तळून घ्या.
- तयार मटार पुरी भाजीबरोबर सर्व्ह करा.