Masala Puri: पण आज आम्ही तुम्हाला मसाला पुरी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही मसाला पुरीची रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे. आतापर्यंत मेथी पुरी, तिखट पुरी खाल्लीच असेल, पण आज आम्ही तुम्हाला मसाला पुरी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ही मसाला पुरीची रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे.

मसाला पुरी बनवण्यासाठी साहित्य:

१. ५ मोठे टोमॅटो
२. ४-५ लाल मिरच्या
३. ६-७ पाकळ्या लसूण
४. १ चमचा धणे पूड
५. १ चमचा जिरे पूड
६. ३ वाटी गव्हाचे पीठ
७. चिमूटभर हिंग
८. मीठ चवीनुसार
९. कोथिंबीर
१०. तळण्यासाठी तेल

मसाला पुरी बनवण्याची कृती:

हेही वाचा: उपवासासाठी खास पनीर कटलेटची सोपी आणि टेस्टी रेसिपी; जाणून घ्या साहित्य आणि कृती..

१. सर्वात आधी मिक्सरमध्ये टोमॅटो, मिरच्या, आलं बारीक करून एका परातीत घ्या.

२. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, एक छोटासा चमचा धणे-जिरे पूड आणि बारीक चिरलेली कोथिंबीर एकत्र करून घ्या.

३. आता त्या मिश्रणात गव्हाचे लागेल तेवढे पीठ घेऊन व्यवस्थित मळून घ्या.

४. नंतर गॅसवर एका कढईत तेल गरम करून पुऱ्या तळून घ्या.

५. तयार गरमागरम मसाला पुरीचा आस्वाद घ्या.