Paneer Frankie: मुलांना बाजारात मिळणारी फ्रँकी खायला खूप आवडते. पण, सतत बाहेरचे पदार्थ खाणं आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. अशा वेळी तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी टेस्टी पनीर फ्रँकी नक्कीच ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि झटपट होणारी आहे.
पनीर फ्रँकी बनविण्यासाठी लागणारे साहित्य:
१. ५-६ गव्हाच्या पोळ्या (चपात्या)
२. १ कप बारीक चिरेलला कांदा
३. १/२ कप किसलेले पनीर
४. १ कप बारीक चिरलेले फ्लॉवर
५. १ कप बारीक चिरलेली गाजर
६. १ चमचा बारीक चिरलेले आले-लसूण
७. ३ चमचे टोमॅटो केचअप
८. ३ चमचे बटर
९. ३ चमचे शेजवान चटणी
१०. चवीनुसार मीठ
११. तेल आवश्यकतेनुसार
पनीर फ्रँकी बनविण्याची कृती:
१. सर्वांत आधी पोळ्या लाटून, त्या भाजून घ्या आणि त्याला बटर लावून ठेवा.
२. त्यानंतर कढई तेल गरम करा आणि त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट घाला.
३. आता त्यात इतर भाज्या टाका आणि त्या व्यवस्थित परतून घ्या. त्यावर वरून मीठ टाका.
४. आता त्यात पनीर, टोमॅटो टाकून, भाज्या वाफेवर शिजवा.
५. आता त्यावर किसलेले चीज टाका.
६. नंतर पोळीला शेजवान चटणी, टोमॅटो केचअप लावून, त्यावर भाजी पसरवा.
हेही वाचा: पावसाळ्यात घरीच झटपट बनवा फ्लफी कॉफी; नोट करा साहित्य आणि कृती…
७. पोळीचा फ्रँकीप्रमाणे गोल रोल करा.
८. तव्यावर पुन्हा एकदा हा रोल भाजून घ्या आणि सर्वांना सर्व्ह करा.