Paneer Popcorn Recipes: उन्हाळ्याच्या दिवसात मुलांसाठी दररोज काय बनवायचं, हा प्रश्न अनेक महिलांना सतावतो. नवीन पदार्थासोबतच मुलांसाठी तो पौष्टिक असणं देखील खूप गरेजचं आहे. अशावेळी तुम्ही पनीर पॉपकॉर्न ट्राय करू शकता. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी आणि टेस्टी आहे. चला तर जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी साहित्य :
१. २०० ग्रॅम पनीर (१-इंच चौकोनी तुकडे करा)
२. १/४ कप मैद्याचे पीठ
३. १ चमचा आलं-लसूण पेस्ट
४. १ चमचा हळद
५. १ चमचा लाल मिरची पावडर
६. १/२ चमचा काळी मिरी पावडर
७. १/४ कप ब्रेडचे तुकडे
८. तळण्यासाठी तेल
९. चवीनुसार मीठ
पनीर पॉपकॉर्न बनवण्यासाठी कृती :
१. सर्वात आधी एका भांड्यात मैदा, आलं-लसूण पेस्ट, हळद, तिखट आणि मीठ एकत्र करा.
२. आता पनीरचे चौकोनी तुकडे पिठात बुडवून कोटिंग करुन घ्या.
३. यानंतर एका वेगळ्या भांड्यात ब्रेडचे तुकडे एकत्र करा.
४. पनीरचे चौकोनी तुकडे ब्रेड क्रंबमध्ये रोल करा आणि त्यांना व्यवस्थित लेप करा.
५. आता एका गरम कढईत तेल मध्यम आचेवर गरम करा.
हेही वाचा: सफरचंद खायचा कंटाळा येतो? मग बनवा पौष्टिक सफरचंद हलवा; नोट करा साहित्य अन् कृती
६. तेल गरम झाल्यावर पनीरचे तुकडे त्यात घालून प्रत्येक बाजूला २-३ मिनिटे सोनेरी होईपर्यंत तळा.
७. नंतर तेलातून पनीरचे चौकोनी तुकडे काढून घ्या आणि प्लेटमध्ये करुन घ्या.
८. आता तयार गरमागरम पनीर पॉपकॉर्न सर्व्ह करा.