Broccoli salad: ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे हंगामी आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. आठवड्यातून किमान तीन ते चार वेळा बोक्रोली या भाजीचे सेवन केल्यास टाइप-टू मधुमेह, हृदयविकार, अस्थमा आणि कर्करोग यावर आळा घालता येतो. आज आम्ही तुम्हाला ब्रोकलीचे पौष्टिक सलाड कसे बनवायचे हे सांगणार आहोत.

ब्रोकली सलाड बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी ब्रोकली
  • २ किसलेले गाजर
  • १ वाटी उकडलेले स्वीट कॉर्न
  • २ वाटी बारीक चिरलेली काकडी
  • २ बारीक चिरलेला टोमॅटो
  • १ वाटी किसलेले चीज
  • १ वाटी दही
  • मीठ चवीनुसार
  • काळी मिरी पावडर चवीनुसार

ब्रोकली सलाड बनवण्याची कृती:

  • सर्वप्रथम ब्रोकली गरम पाण्यात २ मिनिटे उकळवून थंड पाण्यात ठेवा.
  • मोठ्या भांड्यामध्ये ब्रोकली, गाजर, स्वीट कॉर्न, काकडी, टोमॅटो एकत्र करा.
  • दुसऱ्या भांड्यामध्ये दही,मीठ आणि मिरी पावडर एकत्र करून मिक्स करा.
  • दोन्ही बाऊलमधील तयार मिश्रण एकत्र करून सगळं व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यावरून चीज किसून घाला आणि सर्व्ह करा.