Palak Pohe vada: सकाळचा नाश्ता नेहमीच पौष्टिक असावा जेणेकरून त्याचा फायदा आपल्या आरोग्यावर होतो. आज आम्ही तुम्हाला पालक, पोह्याचे पौष्टिक वडे कसे बनवयाचे हे सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया सोपी रेसिपी

पालक-पोह्याचे वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

  • २ वाटी पोहे
  • ३ वाटी पालक
  • १ वाटी साबुदाणा
  • ७-८ हिरव्या मिरच्या
  • दीड वाटी दही
  • १ वाटी कोथिंबीर
  • खाण्याचा सोडा चिमूटभर
  • मीठ चवीनुसार

पालक-पोह्याचे वडे बनवण्याची कृती:

  • रेसिपी बनवण्यापूर्वी सर्वप्रथम साबुदाणा ७ते ८ तासांसाठी भिजत घाला.
  • त्यानंतर पोहे पाण्यात भिजवून नंतर त्यातील संपूर्ण पाणी काढून १० मिनिटांसाठी झाकून ठेवा आणि पालक बारीक चिरून घ्या.
  • नंतर भिजलेल्या पोह्यात पालक, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, मीठ, सोडा , कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर एका प्लास्टिकच्या कागदावर वडे थापावून घ्यावे.
  • गरम तेलामध्ये लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  • आता तळलेले वडे काढून दह्याबरोबर किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.

Story img Loader