गोड पदार्थ कुणाला नाही आवडत? पुरणपोळीपासून, रसगुल्ला, गुलाबजाम, पेढा, बर्फी, हलवा असे सगळे पदार्थ प्रत्येक जण चवीचवीने खातो. परंतु, एवढे गोड झाल्यांनतर काहीतरी चटपटीत किंवा तिखट खायची इच्छा होते तेव्हा आपण मस्त वडा, भजी आणि त्याच्यासोबत मिळणारी एखाद दुसरी हिरव्या मिरच्या हमखास खातो.

परंतु, तुम्हाला जर कुणी सांगितले की, मिरच्यांचासुद्धा हलवा बनवता येतो. मग हा हलवा गोड असेल की तिखट? पण तो खाण्यासारखा तरी असेल का? अशा अनेक शंका तुमच्या मनात आल्या असतील, तर एकदा ही आगळीवेगळी रेसिपी नक्की बघा.

Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
Ganesh chaturthi 2024 khajur ladoo recipe in marathi
Ganesh chaturthi 2024: नैवेद्यासाठी बनवा स्वादिष्ट, पौष्टिक अन् करायलाही सोपे असे खजुराचे लाडू
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
pradnya daya pawar
‘भय’भूती: भित्यंतराचे कल्लोळ
Plaster of Paris, eco-friendly Ganesh idol, POP,
विश्लेषण : प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पर्यावरणास हानिकारक कसे ठरते? पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनवणे शक्य आहे का?
how to avoid Discord in the family
सांदीत सापडलेले… : मतभेद

इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर @sagarskitchenofficial या अकाउंटवरून या मिरचीच्या हलव्याची रेसिपी शेअर केली गेली आहे. व्हिडीओमधील माहितीनुसार हा मिरचीचा हलवा अनेक वर्षांपासून बनवला जाणारा पदार्थ असून, सध्या तो केवळ पंचतारांकित हॉटेल्समध्येच उपलब्ध असतो. असे असले तरीही या साध्या आणि अतिशय सोप्या अशा रेसिपीद्वारे तुम्ही हा पदार्थ घरात बनवू शकता. आता मिरचीपासून बनवल्या जाणाऱ्या मिरचीच्या हलव्याचे साहित्य आणि प्रमाण काय आहे ते पाहा.

हेही वाचा : Recipe : गाजर आणि ‘हा’ पदार्थ वापरून ख्रिसमस, न्यू इयर पार्टीसाठी पौष्टिक मफिन्स बनवा; पाहा रेसिपी….

मिरचीच्या हलव्याची रेसिपी

साहित्य

राजस्थानी हिरव्या मिरच्या [तिखट नसणाऱ्या]
तूप
खवा
साखर
पनीर
वेलची पावडर
बेदाणे

कृती

सर्वप्रथम राजस्थानी पोपटी रंगाच्या मिरच्यांना मधोमध चिरून घेऊन, त्यामधील बिया काढून घ्या.
एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन, त्यामध्ये मिरच्या उकळून घ्या. ही क्रिया किमान तीन ते चार वेळा पाणी बदलून करावी.
त्यानंतर उकडलेल्या सर्व मिरच्या मिक्सरच्या भांड्यात घालून छान वाटून घ्या.

कढईमध्ये एक-दोन चमचे तूप घालून घ्यावे.
तूप हलकेसे तापल्यानंतर त्यामध्ये तयार मिरचीचे मिश्रण घालून ढवळत राहावे.
मिरचीचा रंग थोडा बदलल्यानंतर त्यामध्ये खवा घालून मिश्रण पुन्हा ढवळून घ्या. [३०० ग्रॅम मिरचीसाठी १०० ग्रॅम खवा हे प्रमाण आहे.]
आता काही मिनिटांनंतर त्यामध्ये साखर, किसलेले थोडेसे पनीर, वेलची पूड व बेदाणे घालावेत.
सर्व मिश्रण काही मिनिटांसाठी ढवळत राहावे.
हलवा घट्ट होऊन सुटू लागल्यानंतर कढईखालील गॅस बंद करावा.
एका बाउलमध्ये मिरचीचा तयार हलवा काढून घेऊन तुम्हाला हवे असल्यास, त्यावर थोडा चांदीचा वर्ख, बारीक चिरलेल्या बदामाचे तुकडे आणि चेरी लावून हलव्याची सजावट करावी.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या रेसिपी व्हिडीओला आजवर १३.२ मिलियन इतके व्ह्युज मिळाले आहेत. परंतु, तुम्हाला जर मूळव्याध किंवा पोट, पित्त यासंबंधित काही त्रास असल्यास हा हलवा खाऊ नये, अशी टीपदेखील या व्हिडीओमध्ये दिलेली आहे.