Mango-Rawa Cake: आपल्याकडे खास आंब्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट आवर्जून पाहिली जाते. या दिवसात आंब्यापासून अनेक विविध रेसिपी गृहिणी ट्राय करत असतात. ज्यात कधी आंबा पोळी, आम्रखंड, आमरस, आंबा बर्फी यांसारखे अनेक पदार्थ असतात. पण, आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून मँगो-रवा केक कसा बनवायचा हे सांगणार आहोत. ज्याच्या सेवनाने तुम्हाला आंब्यासोबत केकचादेखील स्वाद मिळेल.
मँगो-रवा केक बनवण्यासाठी साहित्य :
१. २ कप आंब्याच्या फोडी (साल काढलेल्या)
२. २ कप रवा
३. १ कप साखर
४. ५ कप दूध
५. १ चमचा बेकिंग पावडर
६. १/४ कप बदामाचे तुकडे
७. १/२ कप तेल
मँगो-रवा केक बनवण्याची कृती :
हेही वाचा: व्हेजीटेबल लॉलीपॉप मुलांना खूप आवडतील; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
१. सर्वात आधी मिक्सर ग्राइंडरमध्ये रवा बारीक वाटून घ्यावा. त्यानंतर त्याच मिक्सरमध्ये आंब्याच्या फोडी आणि साखर एकत्र बारीक करून घ्या.
२. आता एका भांड्यात रवा आणि आंबा साखरेची पेस्ट एकत्र फेटून घ्या.
३. त्यात एक कप दूध घालून मिक्स करा आणि हे मिश्रण ३० मिनिटे झाकून ठेवा.
४. त्यानंतर त्यात बेकिंग पावडर घालून चांगले मिसळा.
५. शिल्लक राहिलेले दूध घालून केकचे पीठ घट्ट करून घ्या आणि ओव्हन १८० डिग्री सेल्सिअसपर्यंत गरम करा.
६. आता केकच्या भांड्यामध्ये केकचे मिश्रण घाला आणि त्यावर बदामाचे काप टाका.
७. केक प्रीहीट ओव्हनमध्ये ५५ मिनिटे बेक करा व त्यानंतर ओव्हनमधून केक काढून थंड करा.
८. केक थंड झाल्यावर भांड्यातून व्यस्थित काढा आणि हवे असल्यास आंब्याच्या फोडी टाकून सजवा आणि मँगो रवा केकचा आस्वाद घ्या.