Guava Halwa Recipe: सणासुदीनिमित्त अनेकांच्या घरी विविध गोड पदार्थ बनवले जातात. यात विशेषत: शिरा, गुलाबजाम, रसगुल्ला, पुरणपोळी हे पदार्थ बनवले जातात. पण, ज्यांना नेहमी काहीतरी वेगळं खायला आवडतं विशेषत: गोड पदार्थ आवडतात, त्यांच्यासाठी आम्ही चविष्ट पेरुचा हलवा कसा बनवायचा हे सांगणार आहोत. आतापर्यंत तुम्ही गाजराचा हलवा, दूधीचा हलवा खाल्ला असेल, पण आज आम्ही पेरुचा हलवा कसा करायचा हे सांगणार आहोत.

पेरुचा हलवा बनवण्यासाठी साहित्य:

१. १ किलो पेरु
२. ४ चमचे तूप
३. कंडेन्स्ड दूध
४. ६० ग्रॅम खवा
५. १ वाटी बारीक केलेले ड्रायफ्रुट्स

पेरुचा हलवा बनवण्याची कृती:

हेही वाचा: बनवायला एकदम सोपे गव्हाचे पौष्टिक लाडू; पटकन नोट करा साहित्य आणि कृती

१. सर्वात आधी पेरुची साल व बिया काढून पेरु मिक्सरमध्ये फिरवून त्याची प्युरी करून घ्या.

२. आता गॅसवर कढई गरम करून त्यात तूप घालून ही प्युरी आहे त्या प्रमाणापेक्षा पाव प्रमाण होईपर्यंत मंद आचेवर शिजवा.

३. त्यानंतर त्यात कंडेन्स्ड दूध आणि खवा मिसळा.

४. हे सर्व मिश्रण हलके लालसर होईपर्यंत गॅसवर शिजवा.

५. तयार पेरुच्या हलव्यावर बारीक कलेले ड्रायफ्रुट्स घालून हलव्याचा आस्वाद घ्या.