Vegetable Mayo Salad: रेग्युलर सॅलड आपण नेहमीच खातो पण, आज आम्ही तुम्हाला टेस्टी व्हेजिटेबल मेयो सॅलड कसे बनवायचे हे सांगणार आहोत. हे सॅलड खाण्यासाठी जितके टेस्टी आहे तितकेच पौष्टिकही आहे. चला तर जाणून घेऊया साहित्य आणि कृती…
व्हेजिटेबल मेयो सॅलड बनवण्यासाठी लागणारे साहित्य: (Vegetable Mayo Salad)
- २ बटाटे उकडलेले
- २ गाजर किसलेले
- १ बीट किसलेले
- १ कांदा बारीक चिरलेला
- १ वाटी उकडलेले मके
- २ चमचे रेड चिली सॉस
- १ चमचा टोमॅटो सॉस
- १ वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली
- १ कप मेयोनीज
- १ चमचा चाट मसाला
- एक चिमूटभर मिरी पावडर
- मीठ चवीनुसार
हेही वाचा: अवघ्या काही मिनिटांत असा बनवा ग्रीन फ्राईड राईस; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
व्हेजिटेबल मेयो सॅलड बनवण्याची कृती:
- सर्वात आधी उकडलेले बटाटे एका भांड्यात बारीक चिरुन घ्या.
- आता त्यात सर्व बारीक केलेल्या भाज्या घाला आणि त्यावरुन मीठ,
टोमॅटो सॉस, रेड चिली सॉस, मेयोनीज घालून सर्व मिश्रण एकजीव करा. - सगळ्यात शेवटी या मिश्रणात मिरपूड, चाट मसाला, कोथिंबीर घाला.
- आता हे तयार व्हेजिटेबल मेयो सॅलड रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
- काही वेळानंतर थंड झाल्यानंतर सर्व्ह करा.