मखाणा खाण्याचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत.मखाणा हा पोषक तत्वांचा खजिना आहे.त्यात प्रोटीन, फायबर, मॅग्नेशिअम. पोटॅशिअम, फॉस्फरस आणि जीवनसत्वे आढळतात. वजन नियंत्रित करणाऱ्यांना मखाणा खाण्याचा सल्ला दिला जातो. अनेक लोक मखाणा फक्त भाजून खातात, काही लोक भाजलेल्या मखाण्यामध्ये चाट मसाला तिखट मीठ टाकतात. या शिवाय आणखी एका पद्धतीने तुम्ही मखाणा खाऊ शकता. तुम्हाला काहीतरी चटपटीत खायची इच्छा होत असेल पण तुम्ही हेल्दी आहाराचा पर्याय शोधत असाल तर तुम्ही मखाणा भेळ बनवून खाऊ शकता. मखाणा भेळ तुमची चाट खाण्याची इच्छा पूर्ण करेल शिवाय तुम्हाला निरोगी राहण्यास मदत करेल.

मखाणा भेळ

साहित्य
मखाणा -१ वाटी
चिरलेला कांदा – २
चिरलेला टोमॅटो – २
शेंगदाणे – १ वाटी
चिरलेली काकडी – १
शेव – १ वाटी
डाळिंबाचे दाणे – १ वाटी
तेल – १ चमचा
तिखट – १ चमचा
मीठ – चवीनुसार
चाट मसाला – १ चमचा
चिंचेची चटणी – २ चमचे
हिरवी चटणी – २ चमचे

Chana Jor Garam Bhel perfect recipe for evening
‘चना जोर गरम भेळ’ संध्याकाळच्या भुकेसाठी परफेक्ट रेसिपी; नोट करा साहित्य आणि कृती
How to Make Masala Crispy Peanuts Snacks You can eat when you feel hungry in the office Note This Marathi Recipe
फक्त ५ मिनिटांत बनवा ‘चटपटीत मसाला शेंगदाणे’; कोणत्याही वेळी भूक लागल्यावर खाऊ शकता ‘हा’ स्नॅक्स, रेसिपी लिहून घ्या
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
easy recipe from only four onions
VIDEO : घरात भाजी नसेल तर टेन्शन घेऊ नका; ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा
Healthy Nashta Recipe using Moong Dal High Protein Moonglet or Mung Daliche Moonglets note this homemade marathi recipes
मूग डाळीचा बनवा ‘हा’ पौष्टीक पदार्थ; मऊ अन् पचायलाही हलका; साहित्य, कृती लगेच लिहून घ्या
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Methi Gajar Paratha Recipes Paratha Recipes in marathi
पौष्टिक आणि खमंग मेथी गाजर पराठा रेसिपी! कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी…
palak idli recipe
Palak Idli : नाश्त्याला झटपट बनवा पौष्टिक पालक इडली; लगेच रेसिपी नोट करा

हेही वाचा –१५ मिनिटांत झटपट बनवा ‘बटाट्याचे चविष्ट मोमोज’; नोट करा साहित्य आणि कृती

हेही वाचा – पौष्टिक आणि खमंग मेथी गाजर पराठा रेसिपी! कॅल्शियम भरपूर, हेल्दी-हटके रेसिपी…

कृती
मखाणा तेल किंवा तूप टाकून भाजून घ्या कुरकुरीत होई पर्यंत भाजा.
त्यानंतर एका भांड्यात भाजलेला मखाणा काढा.
त्यात शेंगदाणे, चिरलेला कांदा-टोमॅटो टाका.
त्यानंतर बारीक चिरलेली काकडी आणि कोथिंबीर टाका.
अर्धा कप शेव टाका.
चिंचेची चटणी २ चमचे, पुदीना कोथिंबीरीची हिरवी चटणी २ चमचे टाका.
चवीनुसार मीठ टाका.
तुमची हेल्दी मखाणा भेळ तयार आहे.