सकाळी नाश्त्यात काय बनवायचं, असा प्रश्न गृहिणींना पडतो. त्यात महाराष्ट्रीय कुटुंबात नाश्ता म्हणजे काहीतरी वेगळं खायला मिळणार, असं ठरलेलं असतं. अशा वेळी कांदेपोहे, उपमा, शिरा, मेदू वडा, इडली, डोसा, असे वेगवेगळे पदार्थ बनविले जातात. पण, आज आपण नाश्त्यासाठी खास वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत. आज आपण मक्याचा पौष्टिक उपमा कसा बनवतात याची रेसिपी पाहणार आहोत. बनवायला अतिशय सोपी अशी ही रेसिपी चवीलाही वेगळी आहे. चला तर मग मक्याचा पौष्टिक उपमा कसा बनवायचा ते पाहू…

मक्याचा उपमा साहित्य

३ कप मका
२-३ टेबलस्पून तेल
१ टीस्पून मोहरी
१ टीस्पून जीरे
४ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
चिमूटभर हिंग
६-८ कढीपत्त्याची पाने
१/२ टीस्पून हळद पावडर
२ बारीक चिरलेला कांदा
१/२ बारीक चिरलेला टोमॅटो
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून साखर
१ टेस्पून लिंबाचा रस
२ चमचे खिसलेलं खोबरं
कोथिंबीर

मक्याचा उपमा कृती

१. सर्वप्रथम कढईत तेल गरम करा. मोहरी, जीरे, हिंग घालून फोडणी करून घ्या.

२. त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, टोमॅटो आणि कांदा घाला. कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परता.

३. प्रथम थोडे थोडे करून मक्याचे दाणे मिक्सरमधून सरबरीत वाटून घ्यावे

४. आता ते मिश्रण कढईमध्ये घाला आणि चांगले मिसळा. मीठ घालून मिक्स करा, झाकण ठेवून मंद आचेवर ४-५ मिनिटे शिजवा.

५. साखर, लिंबाचा रस, १ टेबलस्पून खोबरे आणि १ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. झाकण ठेवून २ मिनिटे शिजवा.

हेही वाचा >> भंडारी हळदी पापलेट; ‘या’ भन्नाट रेसिपीच्या नॉनव्हेज लव्हर प्रेमात पडतील; ही घ्या सोपी रेसिपी

६. उरलेले खोबरे आणि कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा. लिंबाचा रस व कोथिंबीर पेरून गरम गरम खायला द्यावा हा उपमा अतिशय टेस्टी लागतो व पौष्टिकही आहे