रोज रोज त्याच त्याच भाज्या बनवून कंटाळा आला की जेवणाला काय वेगळं बनवानं सुचत नाही. तेच तेच खाऊन घरातील मंडळींनाही कंटाळा आलेला असतो. काय भाजी बनवावी असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर तुम्ही झटपट मुग मलाई फ्लावर भाजी बनवू शकता. भाजी बनवणे अतिशय सोपे असून त्यासाठी कोणत्याही तयारीची गरज नाही उपलब्ध असणाऱ्या वस्तूंमधून भन्नाट भाजी बनवणे शक्य आहे. चला तर जाणून घेऊया अशा चटकदार मलाई फ्लावर भाजी रेसिपी कशी बनवायची.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मलाई फ्लावर साहित्य

चिरलेला कोबी २ कप
काजू १/४ कप
नारळाचे दूध १/४ कप
बारीक चिरलेला कांदा १
लसूण २ पाकळ्या
आले १ तुकडा
लवंगा २
तमालपत्र १
गरम मसाला १/२ टीस्पून
काळी मिरी पावडर १/२ टीस्पून
वेलची पावडर १ चिमूटभर
कसुरी मेथी २ टीस्पून
चिरलेली हिरवी मिरची १
मीठ चवीनुसार
तेल २ टीस्पून

मलाई फ्लावर कृती

फ्लॉवर गरम मिठाच्या पाण्यात बुडवून थोडा वेळ राहू द्या. काजू आवश्यकतेनुसार पाणी घालून ग्राइंडरमध्ये बारीक करा. कांदा, आले, लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट तयार करा.

कढईत तेल गरम करून त्यात लवंगा आणि तमालपत्र घाला. नंतर पॅनमध्ये कांद्याची पेस्ट घालून चांगले परतून घ्या.

कोबी पाण्यातून काढून पॅनमध्ये टाका आणि मिक्स करा. आता गरम मसाला, काळी मिरी पावडर, मीठ आणि एक कप पाणी घालून मिक्स करा.

पॅन झाकून ८ ते १० मिनिटे फ्लॉवर शिजवा. पॅनमध्ये काजूची पेस्ट घालून मिक्स करा. २ मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. नारळाचे दूध घालून मिक्स करा.

हेही वाचा >> वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी

गरज वाटल्यास थोडं पाणी टाका. मध्यम आचेवर ५ मिनिटे शिजवा. कसुरी मेथी तळहाताने मॅश करुन तयार भाजीमध्ये घाला. चिरलेल्या मिरच्यांनी सजवा आणि सर्व्ह करा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malai cauliflower recipe different style recipe of making cauliflower for winter special srk