साहित्य
२५० मिली नारळ पाणी, अडीच चमचा लिंबाचा रस, तीन चमचे साखर, ३ पुदिन्याची पाने, बर्फ, दोन लहानशी लिंबे.
आणखी वाचा
कृती
लहान लिंबातले एक लिंबू गोलगोल चकत्यांच्या स्वरूपात कापून घ्या. दुसऱ्या लिंबाच्या लहान लहान फोडी करा. एका भांडय़ामध्ये लिंबाच्या फोडी घालून त्या खलून घ्या. आता त्यात नारळपाणी, साखर, लिंबूरस ओता. नीट ढवळा. ज्या पेल्यामध्ये हे पेय द्यायचे आहे, त्यात बर्फाचा चुरा घाला. त्यावर हे मिश्रण ओता आणि लिंबाच्या गोल चकत्या आणि पुदिन्याने सजवा.