कोकणच्या निसर्गसौंदर्याप्रमाणे तिथली खाद्यसंस्कृतीही तितकीच समृद्ध आहे. कोकण म्हटलं कि डोळ्यांसमोर येतो अथांग समुद्र , नारळी पोफळीची झाडे ,आंबा , काजू , फणस याची रेलचेल. मासे , कोंबडी वडे,रस घावणे , सोलकढी असे अनेक प्रकार.मात्र आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. कोकण मालवणची फेमस काळ्या वाटण्याची उसळ.

आंबोळीसाठी साहित्य

  • २ वाट्या तांदूळ
  • १ वाटी उडीद डाळ
  • २ टेबलस्पून पोहे
  • १ टेबलस्पून मेथी दाणे
  • चवीनुसार मीठ
  • काळ्या वाटाण्याचे सांबार बनविण्यासाठी
  • २ वाट्या काळे वाटाणे (रात्रभर पाण्यात भिजवलेले)
  • १ मध्यम आकाराचा कांदा (भाजलेला)
  • १/२ वाटी ओले खोबरे (भाजलेले)
  • ४-५ लसूण पाकळ्या
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ४-६ आमसुले
  • १ टीस्पून हळद
  • १ टीस्पून हिंग
  • २ टीस्पून मसाला
  • १ टीस्पून गरम मसाला
  • १ टीस्पून लाल मिरची पूड
  • १ टीस्पून जिरे पूड
  • १ टीस्पून धणे पूड
  • चवीनुसार मीठ

काळा काळ्या वाटाण्याची उसळ कृती

स्टेप १
प्रथम तांदूळ, मेथी आणि उडीद डाळ ५-६ तास भिजवून, नंतर ती बारीक वाटून घ्यावी. त्यात भिजवलेले पोहे वाटून घालावे. रात्रभर झाकून ठेवावे. सकाळी छान फुलून येते.

स्टेप २
आता भिजवलेले काळे वाटाणे कुकरमध्ये उकडून घ्यावेत. नंतर कांदा, खोबरे, आलं व लसूण खरपूस भाजून घ्यावे आणि थंड झाल्यावर ते मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. थोडे शिजलेले वाटाणे वेगळे काढून ते मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे

स्टेप ३
आता कुकरमध्ये थोडे तेल घेऊन ते गरम झाल्यावर त्यात तयार केलेले वाटण घालून छान परतून घ्यावे. नंतर त्यात हळद,हिंग, लाल मिरची पूड, धणे पूड, जिरे पूड, मसाला व गरम मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात वाटलेले वाटाण्याचे मिश्रण घालून छान मिक्स करावे.

स्टेप ४
सर्व जिन्नस एकत्र खरपूस झाल्यानंतर त्यात उकडलेले वाटाणे घालून मिक्स करून घ्यावे. आवडीनुसार पाणी घालावे. त्यात आमसुले व चवीनुसार मीठ घालून कुकर बंद करून घ्यावा. ३-४ शिट्ट्या झाल्यावर गॅस बंद करावा.

हेही वाचा >> १० मिनिटांत बनवा झणझणीत ढाबा स्टाईल कोल्हापूरी अख्खा मसूर; नोट करा सोपी रेसिपी

स्टेप ५
तयार आंबोळीच्या पिठात चवीनुसार मीठ घालून छान मिक्स करावे. गॅसवर बिडाचा तवा ठेवून त्यावर तेल लावून घ्यावे. आता पळीने तयार पीठ घालावे. झाकण ठेवून एक मिनिटभर शिजवावे आणि परतावे. गरम गरम आंबोळी तयार. काळ्या वाटाण्याच्या सांबार व ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.