Easy Malvani Recipe : कोकणात प्रत्येक पदार्थ बनवण्याची एक वेगळी पद्धत आहे. यात मालवणी स्टाईलचे पदार्थ अधिकच चविष्ट, रुचकर असतात. त्यामुळे अनेकजण मालवणी पदार्थ आवडीने खातात. मालवणी गोड पदार्थ्यांमध्ये खोबऱ्याच्या वड्या, मालवणी खाजा, तांदळाची खीर, काकडीचे धोंडस, चिबुड वडे असे अनेक पदार्थ येतात. याच गोडाच्या पदार्थ्यांमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मालपुवा. मालवणी पद्धतीने बनवलेले मालपुवा एकदा खाल्ले तर तुम्ही आयुष्यभर त्याची चव विसरणार नाही इतके चविष्ट, असतात. त्यामुळे आपणही आज मालवणी पद्धतीने मालपुवा कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत.

साहित्य-

एक कप मैदा, अर्धा कप रवा, अर्धा कप गुळ, दोन चमचे तांदळाचे पीठ, दोन चमचे गव्हाचे पीठ, जायफळ वेलची पूड, चवीसाठी मीठ, दही, एक कप दूध.

Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
walmik karad illegal transportation
वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
buldhana vidarbha
निर्यात क्षेत्रात ‘हा’ जिल्हा पश्चिम विदर्भात अव्वल; ४६५ कोटींची निर्यात
winter will take break Meteorological Department predicts
थंडीला लागणार ‘ब्रेक’, हवामान खात्याचा पावसाचा अंदाज
Sanjay Shirsat On Guardian Minister Post
Sanjay Shirsat : खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच? शिंदे गटाच्या ‘या’ मंत्र्याचा मोठा दावा
Eight new crop varieties developed for commercial cultivation
‘बीएआरसी’कडून आठ नवीन पिकांचे वाण विकसित, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तांदूळ, तीळाच्या वाणांची निर्मिती
paneer bhaji recipe
या थंडीत बटाटा आणि कांदा भाजी खाऊन कंटाळलात? मग पनीरची ही नवीकोरी रेसिपी करा ट्राय

कोणत्याही वाटणाशिवाय १० मिनिटांत बनवा झणझणीत ‘कोळंबी मसाला’; पटकन नोट करा सोपी रेसिपी…

कृती

सर्वप्रथम एका भांड्यात मैदा आणि रवा चांगल्याप्रकारे एकत्र करुन घ्या. आता त्यात गव्हाचे आणि तांदळाचे पीठ मिक्स करा, यानंतर बारीक किसून घेतलेला गूळ पीठात चांगल्याप्रकारे एकजीव करुन घ्या. आता एक चमचा दही आणि थोडे दूध टाकून सर्व मिश्रण पुन्हा चांगल्याप्रकारे एकजीव करा. पीठात गुठळ्या होऊ नये म्हणून आणि पीठ दह्याप्रमाणे चांगल्याप्रकारे तयार व्हावे यासाठी थोडे थोडे दूध टाकून मिश्रण सतत ढवळत राहा. आता तयार पीठ अर्था तास तसेच ठेवा. यानंतर पीठात जायफळ, वेलची पूड आणि थोडा खायचा सोडा मिक्स करा.

दुसरीकडे एका कढईत तेल चांगल्या प्रकारे गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम होताच त्यात तयार पीठ चमच्याच्या साहाय्याने गोल आकारात सोडा. अशाप्रकारे तुम्ही सर्व मालपुवा तयार करुन घ्या. यानंतर ते खाण्यासाठी रबडीबरोबर सर्व्ह करा.

(ही रेसिपी आपण PARAB KITCHEN या युट्युब चॅनलवरुन घेतली आहे.)

Story img Loader