शुभा प्रभू साटम

साहित्य :

केळी, कणिक, थोडा मैदा, गूळ किंवा साखर, वेलची पूड, दही, मीठ.

कृती

पूर्ण पिकून काळसर झालेली केळी घेऊन ती कुस्करून घ्यावीत. यामध्ये थोडी कणिक, थोडा मैदा (ऐच्छिक), दही आणि गूळ किंवा साखर आणि वेलची पूड घालावी. हे पीठ मळून घ्यावे. शक्यतो गूळ वापरावा, कारण त्याने खमंग चव येते. अर्थात आवडत नसल्यास साखर वापरली तरीही चालेल. हे पीठ रात्रभर झाकून ठेवावे किंवा किमान ६-७ तास झाकून ठेवावे. यानंतर दुसऱ्या दिवशी छोटय़ा छोटय़ा पुऱ्या लाटून तळून घ्या.

तळण नको असले तर पीठ घट्ट भिजवण्याऐवजी सैलसर सरसरीत करा. त्याचे अप्पे करता येतील. तयार पीठ फ्रीजमध्ये ३ ते ४ दिवस टिकते.

Story img Loader