How To Make Aamras Recipe Video: उन्हाळ्यात आंबा खाण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. सगळ्यांना आंबा खायला आवडतो. बाजारात सगळीकडे आंबे आणि त्याचे विविध प्रकार दिसू लागले आहेत. अनेकांनी या वर्षीचा पहिला आंबा चाखलादेखील असेल. आंब्यापासून अनेक पदार्थदेखील बनवले जातात, जे इतके स्वादिष्ट असतात की, जे खाल्ल्यानंतर लोक स्वत:चीच बोटे चाटत राहतात. त्यातच आमरस हा आपल्या सगळ्यांच्याच अगदी आवडीचा पदार्थ आहे. आमरस खाल्ल्याशिवाय आपल्यालाही चैन पडत नाही. आमरसाचे सेवन हे शक्यतो गरमागरम पुरी, पुरणपोळी, चपातीसोबत आवडीने केले जाते. आमरस जेवणाची आमंत्रणेही दिली जातात. जर तुम्ही उन्हाळ्याच्या हंगामात आंब्याचा रस प्यायला, तर तो तुमच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरतो. रोज आंब्याचा रस प्यायल्यास रक्ताभिसरण व्यवस्थित राहते, ज्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. त्यासोबतच तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार होत नाहीत.

पिकलेल्या हापूस आंब्यापासून आंबा आईस्क्रीम, आंबा शिरा, आंबा बर्फी, आंबा ज्यूस, आंबा मिल्क शेक असे अनेक पदार्थ तुम्ही बनवू शकता. आंब्याच्या सीझनमध्ये आमरस हा एक असा गोड पदार्थ आहे की, जो उन्हाळ्यात बनवून आवडीने खाल्ला जाऊ शकतो. आता आंब्यांचा सीझन सुरू झाला आहे. तेव्हा तुम्हाला आंबे खाण्याची उत्सुकता नक्कीच निर्माण झाली असेल. जेवणात आमरस आणि पुरीचा बेत आता सगळ्यांच्या घरी पाहायला मिळतो आहे. तेव्हा या लेखातून ते जाणून घ्या, घरच्या घरी आमरस बनवण्याची सोपी रेसिपी पाहा. आमरस बनवणे सोपे असून, तो झटपट तयार होतो. चला तर मग जाणून घ्या आमरसाची रेसिपी.

आमरसासाठी लागणारे साहित्य जाणून घ्या

आंबे
दूध
वेलची पूड
साखर

झटपट आमरस बनविण्याची कृती जाणून घ्या

आमरस बनविण्यासाठी आधी आंबे अर्धा तास स्वच्छ पाण्यामध्ये बुडवून ठेवावेत. नंतर पाण्यातून आंबे बाहेर काढून ते स्वच्छ टॉवेलने नीट पुसून घ्या. आता आंब्यांच्या साली काढून घ्या आणि त्या आंब्यांचे तुकडे करा. आंब्याच्या फोडी एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यानंतर आंब्याच्या फोडी, दूध, साखर, वेलची पूड मिक्सरमध्ये टाकून बारीक फिरवून घ्या. आमरस हा मिक्सरमध्ये बनवल्यावर तो एकसारखा होतो आणि गाठी राहत नाहीत. आमरस गार करून, बर्फाच्या काही तुकड्यांसह ग्लासमधून सर्व्ह करा. या रेसिपीला फॉलो करून पाहा. काही मिनिटात गोडसर आमरस तयार होईल.