Mango Dishes Recipe In Marathi: आपल्याकडे उन्हाळा म्हणजे आंबा असं समीकरण आहे. त्यात कोकणी माणसांसाठी आंबा हा त्यांचा जीव की प्राण असतो. कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबा आवडीने खाल्ला जातो. काहीजण आंबे खाण्यासाठी म्हणून उन्हाळ्याची वाट पाहत असतात. आंबे पिकल्यावर मार्च-एप्रिल महिन्यात बाजारांमध्ये यायला लागतात. घरात आंब्याचे शौकीन असल्याने लोक डझनच्या ऐवजी आंब्याची सबंध पेटी खरेदी करतात. काही घरांमध्ये आंबे सोलून खातात. काहींना आंब्यापासून आमरस, आंबोली वगैरे पदार्थ तयार करुन खायला आवडतात. याच काळात गुढीपाडवा सारखे प्रमुख सण असतात. सुट्टी असल्याने घरात नातेवाईकांची गर्दी जमलेली असते. अशा वेळी आमरसाऐवजी आंब्याापासून नवा पदार्थ बनवून तुम्ही सर्वांना खुश करु शकता.

१. मँगो चीजकेक (Mango cheesecake)

साहित्य:

बेस-

Crispy Butterfly Samosa Recipe
‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Banana health benefits
दररोज एक केळे खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता? तज्ज्ञ काय सांगतात…
How To Make Methi Paratha
Methi Paratha Recipe : मेथीचे बनवा मऊसूत पराठे! हिवाळ्यात नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी बेस्ट रेसिपी
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Ragi Upma Recipe
२ वाटी पीठापासून नाश्त्यामध्ये बनवा नाचणीचा पौष्टिक उपमा; वाचा साहित्य आणि कृती
Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
  • मारी बिस्कीट (१२५ ग्रॅम)
  • मेल्ट केलेले बटर (७५ ग्रॅम)

मिक्श्चर-

  • क्रीम चीज (५०० ग्रॅम)
  • पिठी साखर (१०० ग्रॅम)
  • अंडी (१०० ग्रॅम)
  • व्हॅनिला इसेन्स
  • कॉर्नफ्लोर (१२ ग्रॅम)
  • दही (१२५ ग्रॅम)
  • मँगो पल्प (१२० ग्रॅम)
  • आंब्याचे काप (४०० ग्रॅम)

कृती:

  • मारी बिस्कीट व्यवस्थितपणे कुस्करुन त्यात वितळलेले बटर घाला.
  • केकच्या साच्यामध्ये ते मिश्रण टाका आणि केकचा बेस तयार करा.
  • क्रीम चीज आणि साखर एकत्र मिसळा. त्यात अंडी आणि व्हॅनिला इसेन्स घाला.
  • मिश्रणामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून ते नीट ढवळा. पुढे त्यामध्ये दही, मँगो पल्प टाका.
  • बेसच्यावर हे मिश्रण टाकून केकचा साचा पूर्ण भरुन टाका.
  • बेसचे प्रमाण १:४ आणि चीजच्या मिश्रणाचे प्रमाण ३:४ असावे.
  • पुढे १६० डिग्री सेल्सिअस तापमानात ते मिश्रण बेक करा.
  • केक तयार झाल्यावर थंड होऊ द्या. त्यानंतर त्यावर आंब्याचे काप लावून सजवा.

(रेसिपीतील साहित्याचे प्रमाण हे २ केक्सनुसार देण्यात आले आहे. Recipe Credits – Chef Danish Khan,)

आणखी वाचा – आमरस काळा पडू नये यासाठी ‘या’ ट्रिक्सची घ्या मदत; आंब्याचा सीझन संपल्यावरही खा रसाळ आमरस

२. मँगो मूस (Mango Mousse Cake)

साहित्य:

बेससाठीचे साहित्य –

  • डायजेस्टिव्ह बिस्कीट (८० ग्रॅम)
  • वितळलेले अनसॉल्टेड बटर (३५ ग्रॅम)

मूस तयार करण्यासाठीचे साहित्य-

  • व्हीपिंग क्रीम (२५० ग्रॅम)
  • साखर (५० ग्रॅम)
  • जिलेटिन (१५ ग्रॅम)
  • मँगो प्युरी (२५० ग्रॅम)

मँगो लेयरसाठीचे साहित्य-

  • मँगो प्युरी (१२० ग्रॅम)
  • जिलेटिन (४ ग्रॅम)

कृती:

  • बिस्कीटे कुस्करुन वितळलेल्या बटरमध्ये टाका. केकच्या साच्यात ते मिश्रण टाकून ३० मिनिटांसाठी थंड होऊ द्या.
  • मँगो प्युरीमध्ये २ चमचे पाणी मिसळून ते मिश्रण बाजूला ठेवून द्या.
  • जिलेटिनची शीट थंड पाण्यात ठेवून मऊ होऊ द्या. ते वितळण्यासाठी गरम पाण्याच्या भांड्यात ठेवा.
  • प्युरीत जिलेटन घालून व्यवस्थितपणे मिसळा. व्हीपिंग क्रीम जोपर्यंत मऊ होत नाही, तोपर्यंत नीट ढवळा.
  • पुढे व्हीपिंग क्रीम आणि मँगो प्युरी एकत्र करुन मिसळा. ते मिश्रण केकच्या साच्यात टाका.
  • चार तासांसाठी ते फ्रीजमध्ये ठेवून द्या. त्यात आंब्याचे तुकडे देखील घालता येतात.

मँगो लेयरची कृती:

  • ७० मिली पाण्यात ५ ग्रॅम जिलेटिन मिसळा.
  • त्यात १०० ग्रॅम मँगो प्युरी टाका आणि मिश्रण मूसवर टाका.
  • मिश्रण सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा.
  • अनमोल्ड करुन मनाप्रमाणे सजवा.

(हा पदार्थ ५-६ लोकांना पुरेल अशा हिशोबाने यातील साहित्याचे प्रमाण निश्चित केले आहे. Recipe Credits – Chef Sohail Karimi)

Story img Loader