Mango kesar Lassi: आपल्याकडे खास आंब्यांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीची वाट आवर्जून पाहिली जाते. या दिवसात आंब्यापासून अनेक विविध रेसिपी गृहिणी ट्राय करत असतात. ज्यात कधी आंबा पोळी, आम्रखंड, आमरस, आंबा बर्फी यांसारखे अनेक पदार्थ असतात. पण, आज आम्ही तुम्हाला आंब्यापासून आंबा-केसर लस्सी कशी बनवायची हे सांगणार आहोत. ज्याच्या सेवनाने तुम्हाला आंब्यासोबत केसर आणि लस्सीचेदेखील पोषकतत्व मिळतील. चला तर जाणून घेऊया आंबा-केसर लस्सी.

साहित्य :

१. ३०० मिली दही (कमी आंबट असलेले)
२. २ कप आंब्याचा रस
३. ५-६ कप दूध
४. ८-९ चमचे साखर
५. २ चमचे वेलची पूड
६. १/२ वाटी बदाम, पिस्त्याचे बारीक काप
७. केसर काड्या

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

कृती :

हेही वाचा: उरलेल्या ब्रेडचं करायचं काय? मग ट्राय करा ‘हा’ पदार्थ; झटपट होणारी रेसिपी लगेच नोट करा

१. सर्वप्रथम घरात असलेल्या आंब्यांचा रस काढून तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या.

२. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कमी आंबट असलेले दही, दूध, साखर, केसर आणि वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या.

३. त्यानंतर या मिश्रणात आंब्याचा रसदेखील मिक्स करा.

४. तयार आंबा-केसर लस्सी फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.

५. आंबा-केसर लस्सी गार झाल्यानंतर त्यावर बदाम, पिस्त्याचे बारीक केलेले काप टाकून सजवा.

६. हवं तर यावर तुम्ही आंब्याचे कापदेखील टाकून सजवू शकता.

७. तयार आंबा-केसर लस्सीचा आस्वाद घ्या.

Story img Loader