ज्योती चौधरी-मलिक

मोदक अनेकांच्या आवडीचा पदार्थ. तसाच आंबाही. सध्या आंब्याचा मोसम सुरू झाला आहे. त्यामुळे हे खास आंब्याचे उकडीचे मोदक.

साहित्य : 

सारणासाठी – खोवलेले ओले खोबरे २ वाटय़ा, साखर १वाटी, आमरस एक वाटी.

पारीसाठी –  तांदळाचे पीठ २ वाटय़ा, पाणी २ वाटय़ा, वेलचीपूड १ चमचा, चिमूटभर मीठ, २ चमचे तेल/तूप.

कृती :

प्रथम खोबरे, साखर व आमरस एकत्र करून घ्या. हे सारण गॅसवर ठेवा. कोरडे होईपर्यंत शिजवा. थंड होण्यासाठी ठेवून द्यावे. आता दोन वाटय़ा पाणी गरम करायला ठेवावे. त्यात चिमूटभर मीठ, दोन चमचे तेल किंवा तूप घालावे. उकळी आल्यावर वेलचीपूड घालावी. सर्व एकत्र उकळू लागले की त्यात तांदळाचे पीठ घालावे. गुठळी होणार नाही, याची काळजी घेऊन रवीच्या टोकाने ते ढवळावे. गॅस बंद करून झाकण ठेवावे. १५ मिनिटांनंतर झाकण काढावे. उकड तेल-पाण्याच्या हाताने मळून एका भांडय़ात झाकून ठेवावी. नेहमीप्रमाणे मोदक वळून घ्यावेत. ते मोदकपात्रात १५ मिनिटे वाफवून घ्यावेत. मोदकावर मस्त तुपाची धार सोडून गरमागरमच फस्त करावेत.