Mango Sheera Recipe : सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण आंब्यावर ताव मारताना दिसत आहे. असा क्वचितच कोणी असेल ज्याला आंबा आवडत नाही. तुम्ही आंब्याचे कोणते पदार्थ खाल्ले आहेत. या उन्हाळ्यात आंब्याच्या रसाशिवाय आंब्यापासून काही हटके पदार्थ बनवले का? जर नाही तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण आज आम्ही तुम्हाला एका हटके पदार्थाविषयी सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही कधी आंब्याचा शिरा खाल्ला का? तुम्हाला प्रश्न पडला असेल की आंब्याचा शिरा कसा बनवतात. आंब्याचा शिरा हा अतिशय लोकप्रिय पदार्थ आहे. तोंडात विरघळेल असा मऊ लुसलुशीत आंब्याचा शिरा चवीला अतिशय अप्रतीम वाटतो. हा शिरा कसा बनवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यासाठी खालील व्हायरल व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये आंब्याचा शिरा कसा बनवायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. तुम्ही हा शिरा एकदा खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवून खावासा वाटेल. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात ही सोपी आणि स्वादिष्ट रेसिपी नक्की बनवा. (Mango sheera recipe how to make aambyacha sheera)

व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे –

साहित्य –

  • साजूक तूप
  • रवा
  • आंबे
  • काजू
  • बदाम
  • दूध
  • वेलची पूड
  • साखर

हेही वाचा : Kadhi Bhel : नाशिकची लोकप्रिय कढी भेळ कधी खाल्ली का? आता घरीच बनवा हा अप्रतिम पदार्थ, पाहा व्हिडीओ

कृती

  • सुरूवातीला गॅसवर कढई ठेवा.
  • त्यावर साजूक तूप टाका.
  • त्यानंतर त्यावर बारीक रवा टाका.
  • मंद गॅसवर सोनेरी रंग येईपर्यंत रवा तूपामध्ये भाजून घ्या.
  • त्यानंतर आंब्याचे छोटे छोटे काप त्यात टाका.
  • भाजलेल्या रव्यामध्ये हे आंब्याचे काप एकत्र करा.
  • त्यानंतर त्यात काजू बदामाचे काप आणि वेलची पूड टाका.
  • त्यानंतर त्यात दूध टाका.
  • दूध चांगले त्यात एकजीव होऊ द्या.
  • त्यानंतर त्यात साखर टाका.
  • सर्व मिश्रण एकजीव करा.
  • मंद गॅसवर २ ते ३ मिनिटे झाकून ठेवा
  • गरमा गरम आंब्याचा शीरा तयार होईल.

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी रेसिपी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी

rohini_home_kitchen या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आंब्याचा शिरा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान रेसिपी आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “चव अगदी रंगवली” अनेकांना ही रेसिपी आवडली आहे.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mango sheera recipe how to make aambyacha sheera mango recipe sweet dish food in summer ndj
Show comments