Mangosheera: आंबा आवडत नाही अशी व्यक्ती शोधूनच सापडेल. आंबाप्रेमी वर्षभर उन्हाळ्याची वाट पाहत असतात. गोड, रसाळ आंबा खाण्याचा एकही दिवस आंबाप्रेमी चुकवत नाहीत.सध्या आंब्याचा सिझन सुरू झाला आहे तेव्हा आपल्यालाही आंब्यापासून पदार्थ बनवण्याचे वेध लागले असतील. आंबा म्हणले भरभरुन पदार्थ डोळ्यासमोर येतात, आमरस, आंबा पोळी, आंबा बर्फी, आंबा वडी, आंब्याचे पापड किती म्हणुन पदार्थ बनवू शकतो. त्यापैकी एक म्हणजे आंबा शिरा. जर तुम्ही आंबा प्रेमींपैकी एक असाल तर तुम्ही हा आंबा शिरा नक्की ट्राय करा. पण कधी कधी शिरा खूप चिकट होतो, आंबा नीट मिक्स होत नाही. मात्र आज आपण पाहणार आहोत मस्त मऊ लुसलुशीत, चविष्ट, रवाळ अजिबात चिकट न होणारा आंब्याचा शिरा
आंब्याचा शिरा साहित्य –
- १ कप रवा, १ कप साखर
- १ कप हापूस रस (गाळून किंवा न गाळता)
- पाऊण कप तूप
- काजू तुकडे, बेदाणे
- अर्धा कप नारळाचा किस
- केशर ८,९ काड्या
आंब्याचा शिरा कृती –
अर्धा कप तूप गरम भरून रवा भाजून घ्या. रव्याच्या दीडपट उकळतं पाणी घाला. रवा शिजल्यावर नारळ चव, साखर, आंब्याचा रस घालून मंद गॅसवर शिजवा. उरलेलं पाव कप तूप घालून परता. काजू तुकडे, बेदाणे घाला. या शिऱ्याचा रंग सुंदर येतो. साखर, जास्त आवडत असल्यास घाला. वेलदोडे पूड घालायची आवश्यकता नाही.
हेही वाचा – काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेय? मग बनवा आंबा बर्फी, जाणून घ्या अगदी सोपी रेसिपी