पकोडा म्हटल्यावर प्रत्येकाच्या तोंडाला पाणी येते. त्यामध्येही सध्याच्या पावसाच्या वातावरणात मस्त गरमा-गरम पकोडे खाण्याची मजा वेगळीच आहे. आज आम्ही तुम्हाला एक खास पकोडा रेसिपी सांगणार आहोत. दरवेळीचाच पकोडे खाऊन कंटाळा आला असेल तर हा खास ब्रेड पकोडा नक्की करून पाहा. चला तर जाणून घेऊयात या खास पकोड्याची रेसिपी.

ब्रेड पकोडा साहित्य –

  • ८ ते ९ ब्रेड स्लाईस, ३ ते ४ बटाट्याची पिवळी भाजी
  • १ कप बेसन, २ चमचे तांदळाचं पीठ
  • १ कप पाणी, १/४ टिस्पून हळद
  • १/२ टिस्पून जिरे, चिमुटभर खायचा सोडा
  • चवीपुरते मिठ, तळण्यासाठी तेल.

ब्रेड पकोडा कृती

  • सगळ्यात आधी बटाटे शिजवून कांदा, जीरं, मोहरी आणि हळद घालून भाजी बनवून घ्या. शक्यतो ही भाजी जरा तिखट असेल असं पाहा.
  • एका वाडग्यात बेसन आणि तांदूळ पिठ एकत्र करा. पाणी घालून पीठ तयार करून घ्या. हे पिठ पातळही नसावे आणि एकदम घट्ट सुद्धा नसावे. त्यात हळद, खायचा सोडा आणि चवीपुरते मिठ घाला.
  • मग ब्रेड स्लाईसच्या कडा काढून घ्या. एक एक ब्रेडचा स्लाईस घेऊन त्यावर २ ते ३ चमचे भाजी एकसमान पसरवावी. त्यावर दुसरा ब्रेड स्लाईस ठेवावा. सुरीने ब्रेडचे २ भाग करावेत.
  • पावाच्या दोन्ही बाजूंवर ३ ते ४ थेंब पाणी शिंपडून हलकेच प्रेस करावे.

हेही वाचा – Crispy corn pakoda: पावसाळ्यात करा कुरकुरीत ‘कॉर्न भजी’, पोट भरेल पण मन भरणार नाही!

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
david dhawan advice huma qureshi on weight
“तुला खूप लोक सांगतील वजन कमी कर, सर्जरी कर, पण…”, हुमा कुरेशीला प्रसिद्ध दिग्दर्शकाने वजनाबद्दल दिलेला सल्ला, म्हणाली…
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Budh Shani Kendra Drishti
१२ नोव्हेंबरपासून चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
  • तळण्यासाठी तेल गरम करा. बटाटा भाजी घातलेले पावाचे तुकडे पिठात घोळवून गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. तयार आहेत गरमा गरम पकोडे, हे पकोडे तुम्ही टोमॅटो सॉस, चटणीसोबत इन्जॉय करू शकता.