खवय्यांसाठी सुखाचा मार्ग हा पोटातून जातो. त्यामुळे खवय्ये आपल्या जीभेचे फार लाड करत असतात. बऱ्याचजणांसाठी नॉन व्हेज जीव की प्राण असते. काही खवय्ये तर नॉन व्हेज खाण्याची एकही संधी सोडत नाही. तुम्ही आतापर्यंत हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये मटण रस्सा खाल्लाच असेल. मात्र आज आम्ही तुम्हाला अस्सल मराठवाडी चव चाखण्याची संधी देणार आहे. तुम्ही जर आज मटणाचा बेत केला असेल तर आम्ही तुम्हाला अत्यंत चविष्ट, चमचमीत आणि सोपी मटण रिसिपी सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला अस्सल मराठवाडी चवीचा मटण काळा रस्सा रेसिपी सांगणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मटण काळा रस्सा साहित्य –

  • १ किलो मटण
  • २ मोठे कांदे, आल-लसूण वाटण एक वाटी
  • १ वाटी बारीक भाजलेले तीळ, १ वाटी तेल
  • अर्धा चमता हळद, चवीनुसार मीठ
  • २ मोठे चमचे मटण मसाला
  • अर्धी वाटी कापलेली कोथिंबीर, १ लिंबू

मटण काळा रस्सा कृती –

सर्वप्रथम मटण धुवुन घ्या. मटणाला आल, लसूण, हळद, मीठ, लिंबू लावून फ्रिजमध्ये ठेवा. एका कढईत तेल तापवा. त्यात कांदा उभा कापून तळून घ्या. कांदा काढून घ्या. नंतर भाजलेला कांदा, आलं, लसूण मिस्करमध्ये बारीक करुन घ्या. कढईत तेल घ्या त्यात आता केलेलं वाटण घाला, तीळ टाकून ते मंद आचेवर परतून घ्या. नंतर मटण टाका, गरम मसाला टाका. गरजेनुसार पाणी टाका. मटण १४ मिनिटं शिजू द्यावं. शिजल्यावर वरुन कोथिंबीर टाका.

हेही वाचा – Mutton Chops: नॉन व्हेज खायचा मूड झालाय? घरच्या घरी बनवा चविष्ट मटण चॉप्स, नोट करा रेसिपी

तर अस्सल मराठवाडी चवीचा मटण काळा रस्सा नक्की ट्राय करा आणि कसा होतो हे आम्हाला कळवा.

मराठीतील सर्व रेसिपी बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathvadi mutton kala rassa recipe in marathi must try at home srk
Show comments