वर्षभराची ऊर्जा मिळविण्यासाठी येत्या हिवाळ्यात बनवा घरच्या घरी अत्यंत पौष्टिक काळ्या तिळाची चटणी. तिळकूट हा एक अतिशय चवदार गोड पदार्थ असतो. अनेकदा हा पदार्थ मकर संक्रांतीला बनवले जातात. थंडीच्या मोसमात बहुतेक लोक आरोग्यदायी म्हणून ही रेसीपी करतात. आज मी तुम्हाला तिळकुट कसे तयार करायचे ते दाखवणार आहे. चला तर मग कोकणी पद्धतीनुसार कुरकुरीत तिळकुट तयार करायला सुरुवात करूया.
- १/२ वाटी काळे तीळ
- १/२ वाटी सुकं खोबरे
- ८/९ लाल मिरच्या
- ७/८ लसूण पाकळ्या
- चवीनुसार मीठ
स्टेप १
प्रथम गॅस वर भिडयाच्या तव्यात मंद आचेवर काळे तीळ चांगले भाजून घ्या. तिळाचा रंग हलका तपकिरी होईपर्यंत भाजून घ्या.
स्टेप २लक्षात घ्या की व्यवस्थित भाजल्यानंतर तीळ थोडेसे फुगलेले दिसतील. यानंतर कोरड्या ताटात तीळ काढा.
स्टेप ३
आता त्याच कढईत १ चमचा तूप घालून ते मेल्ट झालं की त्यात गूळ बारीक करून घाला. आता ते हलके गुलाबी होईपर्यंत चमच्याने हलवत मंद आचेवर परतून घ्या. ते चांगले भाजल्यावर त्यात पिठी साखर टाका आणि एकजीव करून घ्या.
स्टेप ४
आता त्यात भाजलेले तीळ आणि वेलची पूड घालून मिक्स करा. चमच्याने सतत ढवळत असताना किमान दोन मिनिटे मध्यम आचेवर शिजवा. आता गॅस बंद करा आणि हे मिश्रण थोडे थंड होऊ द्या.
स्टेप ५
आता एका प्लेटमध्ये तूप लावून ग्रीस करा. यानंतर, थोडं थंड झालेले मिश्रण एका प्लेटमध्ये ओता आणि चांगले पसरवा. हवं असल्यास बेलण्यावर थोडं तूप लावून मिश्रण हलक्या हाताने लाटून घ्या म्हणजे ते एकसारखे होईल.
हेही वाचा >> हिवाळ्यात जेवणात हवीच चाकवत भाजी! जाणून घ्या सोपी रेसिपी
स्टेप ६
तसेच लसूण पाकळ्या आणि लाल मिरच्या ही भाजून घ्या. प्रथम भाजलेल्या लाल मिरच्या मिक्सरला वाटून घ्या. नंतर इतर सर्व मिश्रण एकत्र करून त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्सरला वाटून घ्या.
तीळ हे गरम असल्याने थंडीच्या दिवसात तिळकूट चटणी आवर्जून खावी.बाळंतीण बाईला गरमागरम मुगाची खिचडी आणि वरून १ चमचा तिळकूट घालून खायला देतात