Masala Beetroot Lassi: ऐन उन्हाळ्यात कोणीतरी थंड दही लस्सीचा ग्लास हातात दिला तर अहा… काय मज्जा येईल. लस्सी चविष्ट असण्यासोबतच शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. लस्सी शरीराला थंड ठेवण्यासाठी खूप मदत करते. आतापर्यंत तुम्ही दह्याची लस्सीचा आस्वाद घेतला असेल मात्र कधी मसाला बीटरूट लस्सी टेस्ट केली आहे का. जर तुम्हालाही लस्सी प्यायला आवडत असेल तर ती काही मिनिटांत घरीच तयार करता येईल. चला तर मग पाहुयात कशी करायची मसाला बीटरूट लस्सी..
बीट रूट लस्सी साहित्य –
- १ बीट रूट, बीट साल काढून किसून घेणे
- १/४ किलो दही
- १०० ग्रॅम साखर, वेलची पावडर
- दुध,एक लिटर दुधावरची जाड साय
- तुप दोन मोठे चमचे
- आठ-दहा बदाम, काजू बदाम मनुके पिस्ता आवडतील ते सगळे ड्रायफूट.
- ३ चमचे भिजलेला सब्जा
बीट रूट लस्सी कृती –
- बीटरूट सोलून, कापून, उकळवून वेगळे ठेवा. आता दही, साखर, काळे मीठ, जिरे पावडर, वेलची पावडर आणि मीठ एकत्र करून चांगले फेटून घ्या.
- त्यानंतर उकडलेले बीटरूट मॅश करा आणि दह्याच्या मिश्रणात घालून चांगले मिक्स करा, आता बीटरूटचे मिश्रण फ्रीझमध्ये ठेवा.
- यानंतर जेव्हा जेव्हा तुम्हाला लस्सी प्यायची असेल तेव्हा एका ग्लासमध्ये लस्सी टाका आणि त्यात काजू, मध आणि अननस मिक्स करून प्या.
हेही वाचा – क्रंची मिसळ; घरच्या घरी बनवा झणझणीत मिसळ पाव, जाणून सोपी मराठी रेसिपी
स्सी उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्याचे काम करते. लस्सीचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.