Masala Bhakri Recipe : भाकरी हा महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही आजवर भाकरीबरोबर ठेचा, झुणका, पिठलं खाल्ले असेल किंवा भाकरीचे अनेक प्रकारही खाल्ले असेल पण तुम्ही कधी मसाला भाकरी खाल्ली आहे का? हो, मसाला भाकरी. हो झटपट होणारी मसाला भाकरी चवीला अत्यंत स्वादिष्ट आणि बनवायला अतिशय सोपी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मसाला भाकरी कशी बनवायची?
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मसाला भाकरीची रेसिपी सांगितली आहे. (Masala Bhakri recipe)

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

Crispy Potato Shorts Recipe easy breakfast recipe
Crispy Potato Shorts Recipe: नाश्त्यासाठी झटपट बनवा ‘क्रिस्पी पोटॅटो शॉर्ट्स’, लगेच लिहून घ्या रेसिपी
How To Make Amla Candy In Marathi
Amla Candy: मार्केटमध्ये मिळणारी आंबट, गोड ‘आवळा कँडी’…
How to Make Healthy Bajari khichdi Bajrichi khichdi recipe in marathi
थंडीत कुकरमध्ये झटपट करा बाजरीची पौष्टीक खिचडी; हिवाळ्यात आरोग्यासाठी फायदेशीर अशी सोपी रेसिपी
Crispy Rava Vada recipe
एक वाटी रव्यापासून झटपट बनवा कुरकुरीत रवा वडे; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Roasted Chicken Salad recipe in marathi Roasted Chicken Salad recipe
केरळ स्पेशल रोस्टेड चिकन सॅलड; संडे स्पेशल ही रेसिपी नक्की ट्राय करा
Home Made Maggi
Home Made Maggy: चटपटीत नाश्त्यासाठी बनवा गव्हाच्या पिठापासून मॅगी; लहान मुलं होतील खूश
Amla chutney recipe
हिवाळ्यात खा पोषणमूल्यांनी परिपूर्ण आवळ्यांची चटणी! झटपट लिहून घ्या रेसिपी
khakra chaat recipe
सायंकाळच्या भुकेसाठी झटपट बनवा कुरकुरीत खाकरा चाट, लिहून घ्या स्ट्रीट स्टाइल चाट रेसिपी

साहित्य –

  • एक वाटी पाणी
  • एक वाटी तांदळाचे पीठ
  • चिली फ्लेक्स
  • कोथिंबीर
  • मीठ

हेही वाचा : Sweet Corn Dhokla: एक कप रवा, दही घालून करा ‘मक्याचा ढोकळा’; फक्त १५ मिनिटांत होईल तयार; रेसिपी लिहून घ्या

कृती

  • सुरुवातीला एक कढई घ्या.
  • त्या कढईत एक वाटी पाणी घ्या.
  • ही कढई गॅसवर ठेवा
  • त्यानंतर त्यात मीठ टाका
  • त्यानंतर त्यात चिली फ्लेक्स टाका.
  • थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • त्यानंतर एक वाटी तांदळाचे पीठ टाका.
  • तांदळाचे पीठ पाण्यामध्ये एकत्रित करा.
  • त्यानंतर गॅस बंद करा आणि कढईतील मिश्रण एका ताटात काढा.
  • त्यानंतर थोडे पाणी टाकून मिश्रणाचा घट्ट असे पीठ मळून घ्या.
  • त्यानंतर छोटे छोटे गोळे करून भाकरी लाटून घ्या.
  • त्यानंतर तव्यावर तूप टाका आणि त्यावर ही भाकरी दोन्ही बाजूने भाजून घ्या.
  • त्यानंतर पुन्हा भाकरीला तूप लावा आणि पुन्हा भाकरी चांगली भाजून घ्या
  • मऊसूत अशी मसाला भाकरी तयार होईल.
  • ही भाकरी तुम्ही लहान मुलांना टिफीनवर देऊ शकता.
  • झटपट होणारी ही मसाला भाकरी तुम्ही एकदा खाल तर तुम्हाला पुन्हा पुन्हा खावीशी वाटेल.
  • ही भाकर तुम्ही तुमच्या आवडत्या चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर खाऊ शकता.

पाहा व्हायरल व्हिडीओ

swast_ani_mast_recipes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “झटपट आणि पौष्टिक तांदळाची मसाला भाकरी” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वा ताई…लहान मुलांसाठी नेहमी रेसिपी सांगत जा,,टिफिनला असे पदार्थ असले की टिफीन शाळेतच मोकळा होईल.” तर एका युजरने लिहिलेय, “टेस्टी दिसत आहे, मी करेन” आणखी एका युजरने लिहिलेय, “छान पौष्टिक रेसिपी, पण सॉस व केक ऐवजी अजून काही पौष्टिक सुचवता आलं तर बघा” अनेक युजर्सना ही रेसिपी खूप आवडली आहे.