Masala Bhendi Recipe : लहानांपासून मोठ्यापर्यंत अनेकांना भेंडीची भाजी आवडते. काही लोकांची तक्रार असते की भेडींची भाजी का चिकट होते. तुम्ही बनवलेली भेंडीची भाजी सुद्धा चिकट होते का? जर हो तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. तुम्ही अशी मसाला भेंडी बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी जाणून घ्या. ही मसाला भेंडी अतिशय कुरकुरीत आणि चवीला स्वादिष्ट वाटते.

साहित्य

कृती

  • भेंडी
  • मोहरी
  • जिरे
  • हिंग
  • लसूण
  • कढीपत्ता
  • लसूण
  • लाल मिरची पावडर
  • मसाला
  • धने पूड
  • मीठ
  • लाल तिखट
  • शेंगदाण्याचा कूट
  • कोथिंबीर
  • तेल

हेही वाचा : सिंहगड स्टाईल लोकप्रिय कांद्याची झणझणीत चटणी; ही रेसिपी लगेच नोट करा

कृती :

  • भेंडी स्वच्छ धुवून घ्या आणि कोरडी करा
  • भेंडीचे देठाकडील भाग कापून उभे काप करायचे.
  • एका कढईत तेल गरम करा
  • गरम तेलात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता आणि लसूण टाका.
  • त्यानंतर त्यात उभे काप केलेली भेंडी टाकायची
  • त्यानंतर कढईवर झाकण ठेवून भेंडी शिजवून घ्या
  • त्यानंतर भेंडी सात ते आठ मिनिटे परतून घ्या.
  • त्यानंतर त्यावर मसाले, धनेपूड आणि लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि शेंगदाण्याचा कूट टाका.
  • भाजी चांगल्याने परतून घ्या आणि त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • मसाला भेंडी तयार होईल.