Masala Chaap Recipe: अनेकदा रेस्टॉरंटमधले असे काही पदार्थ असतात जे आपल्याला खूप आवडतात म्हणून अनेकदा आपण वेगळं काही ट्राय करण्याऐवजी तेच ऑनलाईन ऑर्डर करतो आणि त्याचा आस्वाद घेतो. पण यामुळे तुमचे तर खर्च होतातच पण नेहमीच बाहेरच खाल्ल्यामुळे पोटदेखील बिघडतं. म्हणून आज आपण रेस्टॉरंट स्टाईल मसाला चाप रेसिपी जाणून घेणार आहोत, जी घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवता येते आणि चवदारही लागते.

साहित्य

मसाला चाप

२ चमचे दही

१ चमचा लाल तिखट

१ चमचा मीठ

१ चमचा मसाला

सुकी लाल मिरची

लसूण पाकळ्या

१ टोमॅटो

१ कांदा

१ चमचा जिरे

१/२ चमचा हळद

१ चमचा धणे पूड

१ चमचा गरम मसाला

हेही वाचा… Potato Egg Roll: बटाट्यापासून बनवा ‘ही’ क्रिस्पी रेसिपी, एकदा खाल तर खातच राहाल

मसाला चाप बनवण्याची कृती

  1. मसाला चाप १० मिनिटं उकडून घ्या.
  2. चाप तुकड्यात कापून तळा.
  3. मॅरिनेशनसाठी २ चमचे दही, १ चमचा लाल तिखट, १ चमचा मीठ, १ चमचा मसाला घाला.
  4. एका कढईत सुकी लाल मिरची आणि लसूण पाकळ्या टाका.
  5. १ टोमॅटो आणि १ कांदा कापून त्यात घाला.
  6. १० मिनिटं शिजवा आणि त्याचं प्युरी बनवा.
  7. दुसऱ्या कढईत १ चमचा जिरे, १ चमचा लाल तिखट, १/२ चमचा हळद, १ चमचा धणे पूड, १ चमचा गरम मसाला आणि प्युरी टाका.
  8. ५ मिनिटं शिजवा.
  9. आता त्यात चाप घाला.
  10. २ मिनिटं शिजवा.
  11. पाणी घाला आणि ५ मिनिटं शिजवा.
  12. गरम मसाला आणि कोथिंबीर घाला.
  13. तुमचं मसाला चाप तयार आहे. आनंद घ्या!

हेही वाचा… ‘बटरफ्लाय समोसा रेसिपी’, नाव ऐकूनच तोंडाला सुटलं ना पाणी, लगेच वाचा साहित्य आणि कृती

पाहा VIDEO

Story img Loader