How To Make Masala Kaju : हॉटेलमध्ये गेल्यावर आपण लगेच जेवण ऑर्डर करत नाही. सुरवातीला आपण सूप किंवा क्रिस्पी असं काहीतरी मागवतो. या लिस्टमध्ये टाईमपास म्हणून खाण्यासाठी आपण कधी-कधी स्टार्टर म्हणून मसाला काजू सुद्धा ऑर्डर करतो. छोटी भूक भागवण्यासाठी हा कुरकुरीत, चटकदार पदार्थ खायला प्रत्येकालाच आवडतो. पण, आम्ही जर तुम्हाला सांगितलं की, हा पदार्थ तुम्हाला घरी सुद्धा करता येईल तर तुम्ही बनवून बघला का? हो… तर एका युजरने या पदार्थाची एक आगळीवेगळी रेसिपी सांगितली आहे ; ज्यात तुम्हाला काळजी देखील वापरण्याची गरज पडणार नाही. चला तर पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या.

साहित्य :

१. तीन कप मैदा

Maharashtrian batatyachi bhaji recipe naivedya recipe
नैवेद्याची बटाटा भाजी; १० मिनिटांत होणारी सोपी रेसिपी एकदा नक्की ट्राय करा
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
Tandalache Vade recipe in marathi
तांदुळ-नाचणीच्या पिठापासून बनवा कुरकुरीत वडे; ‘ही’ घ्या सोपी मराठी रेसिपी
Shravani somvar make Jaggery Makhane
श्रावणी सोमवारी आवर्जून बनवा गूळ मखाणे; नोट करा साहित्य आणि कृती
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
Makhana Chivda recipes
उपवासाच्या दिवशी फक्त ५ मिनिटांत झटपट बनवा मखाण्याचा चिवडा; पटकन नोट करा साहित्य आणि कृती
Make Tricolor Cake on August 15 Make
१५ ऑगस्टनिमित्त बनवा ‘तिरंगा केक’; पटकन नोटस करा साहित्य आणि कृती
Achari Mirchi fry recipe in Marathi mirachi fry recipe in marathi
ढाबा स्टाईल झणझणीत मिरची फ्राय; तोंडी लावण्यासाठी मिरचीची भन्नाट रेसीपी नक्की ट्राय करा

२. एक चमचा मीठ

३. एक चमचा ओवा

४. १/३ कप तेल

५. चिमूटभर बेकिंग सोडा

६. १/२ चमचा काळं मीठ

७. एक चमचा सैंधव मीठ

८. एक चमचा चाट मसाला

९. १/२ चमचा जिरे पावडर

१०. एक चमचा आमचूर पावडर

११. १/४ चमचा लाल तिखट

१२. मोहरीचे तेल

हेही वाचा…Corn Pancake : मक्याचे बनवा पौष्टीक पॅनकेक! लहान मुलं आवडीने खातील; रेसिपी लिहून घ्या

कृती :

१. ताटात तीन कप मैदा घ्या. त्यामध्ये ओवा, मीठ, बेकिंग सोडा, तेल टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. (तुम्ही जेवढा मैदा घ्याल त्याप्रमाणे तेल त्यात घालावं) .

२. नंतर पिठात पाणी घालून कणिक मळून घ्या आणि दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवा.

३. एका प्लेटमध्ये काळं मीठ, सैंधव मीठ, चाट मसाला, जिरे पावडर, आमचूर पावडर, लाल तिखट घ्या.

४. तुम्ही पीठ मळलं आहे त्याचे सामान भाग करून घ्या आणि त्याची एक गोल पोळी लाटून घ्या.

५. त्यानंतर बाटलीच्या झाकणाच्या साहाय्याने पिठाचे चंद्रकोर आकाराचे छोटे-छोटे काजू बनवा.

६. त्यानंतर थोडा वेळ २० ते २५ मिनिटे सुकायला ठेवा.

७. तेल गरम करा आणि हे सोनेरी रंग येईपर्यंत काजू तळून घ्या.

८. त्यानंतर पुन्हा तेल गरम करा त्यानंतर आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले सर्व मसाले त्यात घाला आणि त्यात तळून घेतलेले काजू घाला.

९. अशाप्रकारे मैद्याचे पीठ वापरून तुमचा काजू मसाला तयार.

सोशल मीडियाच्या @corner_to_discover या इन्स्टाग्राम अकाउंटवरून ही रेसिपी घेण्यात आली आहे.