Masala Omelette Recipe : ऑम्लेट हे नाव जरी कानावर पडले तरी तोंडाला पाणी सुटतं. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ऑम्लेट आवडतं. तुम्ही ऑम्लेटचे नवनवीन प्रकार खाल्ले असेल पण तुम्ही कधी मसाला ऑम्लेट खाल्लं आहे का? आज आपण मसाला ऑम्लेट कसं बनवायचं, हे जाणून घेणार आहोत.
साहित्य
- अंडी
- कांदा
- हिरवी मिरची
- लाल तिखट
- हळद
- जिरे
- कोथिंबीर
- तेल
- मीठ
हेही वाचा : पितृपक्षात अळू वडी करताय? अशी बनवा कुरकुरीत अळू वडी, जाणून घ्या ही सोपी पद्धत
कृती
- सुरुवातीला कांदा आणि हिरवी मिरची बारीक चिरुन घ्यावी.
- एका मोठ्या भांड्यामध्ये अंडे फोडून घ्यावे
- त्यात जिरे, तिखट, मीठ, हळद आणि चवीनुसार मीठ टाकावे
- त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकावी.
- गॅसवर तवा ठेवावा.
- गरम तव्यावर एक चम्मच तेल टाकून तयार मिश्रण तव्यावर पसरवून घ्यावे.
- त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी.
- ऑम्लेट दोन्ही भाजून चांगल्याने भाजून घ्यावे.
- गरम गरम ऑम्लेट सर्व्ह करावे.