Masala Papad : हॉटेलमध्ये गेला आणि मसाला पापड मागवला नाही तर काय मजा! हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर फूड लिस्टमधील सर्वात जास्त पसंती ही मसाला पापडला असते. जेवणाच्या सुरुवातीला स्टार्टर म्हणून अनेक लोक आवडीने मसाला पापड मागवतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण मसाला पापड आवडीने खातात. त्यामागील कारण म्हणजे मसाला पापड फारसा तिखट सुद्धा नसतो आणि तितकाच चविष्ठ असतो. त्यामुळे प्रत्येक जण मसाला पापडवर ताव मारतात. अनेकांना वाटतं की हॉटेलसारखा मसाला पापड हा घरी बनवला जात नाही पण असं अजिबात नाही. तुम्ही घरी हॉटेलसारखा स्वादिष्ट मसाला पापड बनवू शकता. फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्ही मसाला पापड बनवू शकता. त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

साहित्य

  • कांदा
  • टोमॅटो
  • पापड
  • कोथिंबीर
  • लाल तिखट
  • मीठ
  • चाट मसाला
  • शेव

हेही वाचा : हिवाळ्यात गाजराचे लोणचे का खावे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे, नोट करा सोपी रेसिपी

कृती

  • सुरुवातीला एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली कांद्याची पात. बारीक चिरलेली हिरवी मिरची
    आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकावी. सर्व भाजीचे एकत्रित मिश्रण करावे.
  • त्यानंतर एका दुसऱ्या भांड्यात लाल तिखट, जिरेपूड, मीठ, चाट मसाला हे सर्व एकत्र करावे आणि मसाला तयार करावा.
  • त्यानंतर एका पॅनमध्ये पापड भाजून घ्यावा किंवा तुम्ही आवडीनुसार पापड तेलातून तळू शकता.
  • या पापडावर सर्व भाजीचे मिश्रण टाकावे आणि त्यावर एकत्रित केलेला मसाला यावर टाकावा.
  • त्यानंतर यावर बारीक शेव टाकावे आणि मसाला पापड सर्व्ह करावा.