Masala Samosa Puri : अनेकदा लहान मुलांना अचानक भूक लागते तेव्हा आपण त्यांना बिस्किट खायला देतो पण तुमचे मुलेही बिस्किटे खाऊन कंटाळली असेल तर तुम्ही त्यांना मसाला समोसा पुरी बनवून खाऊ घालू शकता. ही मसाला समोसा पुरी एकदा केली की दहा दिवस टिकते. तुम्ही जर कुठे बाहेर फिरायला जात असाल तर ही समोसा पुरी नक्की बरोबर न्या. बाहेरुन विकत आणणाऱ्या चिप्स कुरकुरेपेक्षा ही समोसा पुरी अत्यंत स्वादिष्ट आणि तितकीच पौष्टिक असते. ही समोसा पुरी गहू किंवा मैद्यापासून बनवत नाही तर रव्यापासून बनवली जाते त्यामुळे पचायला सुद्धा ही हलकी असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही समोसा पुरी कशी बनवायची, त्यासाठी ही सोपी रेसिपी लगेच नोट करा.

साहित्य

  • रवा
  • मीठ
  • तेल
  • लाल तिखट पावडर
  • काळे मीठ
  • चाट मसाला
  • मीठ
  • जिरेपूड
  • पिठी साखर
  • पाणी

हेही वाचा : Tiranga Shahi Rice : प्रजासत्ताक दिनानिमित्त घरच्या घरी बनवा तिरंगा शाही राईस, लगेच रेसिपी नोट करा

कृती

  • सुरूवातीला एक कप बारीक रवा घ्या.
  • त्यात चवीपुरते मीठ घाला.
  • त्यात गरम केलेले चार चमचे तेल घाला.
  • कडकडीत गरम केलेलं तेल घाला. त्यामुळे समोसा पुरी कुरकरीत होईल.
  • त्यात थोडे गरम पाणी घाला.
  • आणि पीठ भिजवून घ्या.
  • पीठाचा गोळा १५ मिनिटे झाकुन ठेवा
  • त्यानंतर एका भांड्यात दोन चमचे लाल पावडर टाका
  • त्यात पाव चमचा काळे मीठ घाला.
  • त्यानंतर त्यात पाव चमचा चाट मसाला घाला.
  • अर्धा चमचा जिरेपूड घाला.
  • शेवटी हे मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर त्यात एक चमचा पिठी साखर घाला.
  • यामुळे या मसाल्याला आंबट, गोड, तिखट अशी चव येते.
  • त्यानंतर झाकुन ठेवलेला पीठाच्या गोळा घ्या.
  • प्रमाणानुसार पोळी एवढ्या गोळ्याची पातळ पोळी लाटून घ्या.
  • त्यानंतर या पातळ पोळी पट्ट्यांप्रमाणे चाकून कापून घ्या
  • त्यानंतर एक पोळीची एक पट्टी घ्या आणि त्रिकोनी आकारामध्ये काप करा.
  • एका कढईत तेल गरम करा. मंद आचेवर हे त्रिकोनी काप तळून घ्या.
  • तळलेल्या या त्रिकोनी आकाराच्या समोसा पुरीवर आंबट, गोड आणि तिखट असा बनवलेला चविष्ठ मसाला टाका.
  • कुरकुरीत मसाला समोसा पुरी तयार होईल.
  • या मसाला समोसा पुरी तुम्ही ट्रिपला जाताना बरोबर घेऊन जाऊ शकता.

Story img Loader