Masale Bhaat Recipe : मसालेभात हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. कोणताही कार्यक्रम असो किंवा सार्वजानिक ठिकाणी जेवण मसालेभात हा आवर्जन मेन्यूमध्ये असतो. कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर आपण हौशीने मसालेभात व कढीचा बेत आखतो. तुम्हालाही मसालेभात आवडतो का? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
अनेकदा घरी मसालेभात बनवताना बिघडतो पण तुम्ही काही टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचा मसालेभात कधीही बिघडणार नाही. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला झटपट आणि चटपट होणारा मसालेभात कसा बनवायचा, हे दाखवले आहे. ही मसालेभाताची रेसिपी पाहून तुम्हीही थक्क व्हाल. जाणून घेऊ या हा मसालेभात कसा बनवायचा?

हेही वाचा : Video : “जा, तुझ्या बापाला फोन कर”; मुंबई लोकलमध्ये महिलांचा राडा; छत्री भिरकावत केलं असं काही की, तिनं सीटच सोडली

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

साहित्य

  • तेल
  • जिरे
  • मोहरी
  • तमालपत्र
  • बटाटा
  • मटार
  • कोथिंबीर
  • कांदा
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • टोमॅटो
  • आलं पेस्ट
  • लसूण खोबऱ्याची पेस्ट
  • शेंगदाणे
  • हळद
  • मीठ लाल तिखट
  • हिंग
  • गरम मसाला
  • कांदा लसूण पावडर
  • तांदूळ
  • पाणी

कृती

  • सर्वप्रथम गॅसवर एक कुकर ठेवा.
  • या कुकरमध्ये तेल गरम करा.
  • त्यानंतर गरम तेलात मोहरी आणि जिरे टाका.
  • त्यानंतर त्यात दोन तीन तमालपत्र टाका.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाका
  • कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाका.
  • त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाका.
  • त्यानंतर आलं लसूण व खोबऱ्याची पेस्ट टाका
  • त्यानंतर त्यात मटार आणि बारीक चिरलेला बटाट्याचे काप टाका. त्यानंतर त्यात शेंगदाणे टाका
  • त्यानंतर त्यात हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला, हिंग, कांदा लसूण पावडर टाका.
  • सर्व मिश्रण एकजीव करा.
  • त्यानंतर स्वच्छ पाण्याने तिनदा धुतलेले तांदूळ त्यात टाका. सर्व मिश्रण एकत्र करा.
  • त्यानंतर त्यात पाणी टाका आणि कुकरच्या दोन किंवा तिन शिट्ट्या होऊ द्या.
  • गरमागरम कुकरमध्ये बनवलेला मसालेभात तयार होईल.
  • हा मसालेभात पाहून तुमच्या तोंडाला ही पाणी सुटेन.

पाहा व्हायरल व्हिडीओ

annapurna_amruta या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “रात्रीच्या जेवणात झटपट तयार होणारा चमचमीत मसालेभात…”

हेही वाचा : तिने त्याच्याबरोबर रेस्टॉरंटमध्ये केलं ‘असं’ काही की दोघांना पडलं महागात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा हा VIDEO होतोय VIRAL

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान रेसिपी सांगितली.” तर एक युजर लिहितो, “मसालेभात आणि कढी. खूप छान झटपट तयार होणारा मसालेभात” आणखी एका युजरने लिहिलेय, “मसालेभात – प्रेम” एक युजर लिहिते,”मी असाच मसालेभात तयार करेन.”