Home Made Matar Cutlet : उद्यापासून नवीन आठवड्याची सुरुवात होईल. आठवड्याची सुरुवात म्हणजे ऑफिस आणि शाळेसाठी सकाळी काहीतरी डब्याला बनवणे. यासाठी स्त्रिया अगदी संध्याकाळपासूनच तयारी करायला सुरुवात करतात. डब्यासाठी पोळी-भाजी बनवण्याबरोबर नाश्ता सुद्धा बनवावा लागतो. मग नाश्ता काय बनवायचा हा सुद्धा विचार करावा लागतो. जर तुम्हालाही असाच प्रश्न पडला असेल. तर इन्स्टाग्रामवर व्हायरल होणारा हा व्हिडीओ नक्की बघा… एका युजरने यावर कुरकुरीत नाश्ता (Matar Cutlet) बनवण्याची सोपी रेसिपी सांगितली आहे.

साहित्य :

१. पाणी

२. मीठ

३. मटार

४. कांदा

५. गाजर

६. ढोबळी मिरची

७. पनीर

८. गरम मसाला

९. पावभाजी मसाला

१०. चाट मसाला

११. हळद

१२. लाल तिखट

१३. कस्तुरी मेथी

१४. जिरा पावडर

१५. कोथिंबीर

१६. मक्याचे पीठ

१७. बेसन

व्हिडीओ नक्की बघा…

कृती :

१. गॅस चालू करा. टोपात पाणी घ्या त्यात पाण्यात मीठ टाका.

२. नंतर त्यात मटार घाला आणि ५ ते ७ मिनिटे शिजवून घ्या.

३. त्यानंतर मटार स्मॅश करून घ्या.

४. मग त्यात कांदा, गाजर, ढोबळी मिरची, पनीर, गरम मसाला, पावभाजी मसाला, चाट मसाला, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ, कस्तुरी मेथी, जिरा पावडर, कोथिंबीर, बेसन व मक्याचे पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्या.

५. नंतर पुन्हा त्यात बेसन पीठ, खाण्याचा सोडा घालून मिक्स करून घ्या.

६. नंतर तयार मिश्रणाला आवडीनुसार आकार देऊन कटलेट बनवा.

७. नंतर गरम तेलात तळून घ्या.

८. अशाप्रकारे तुमचा कुरकुरीत नाष्टा तयार.

९. हिरव्या चटणी किंवा सॉसबरोबर तुम्ही हे कटलेट (Matar Cutlet) खाऊ शकता.

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @bhannat_swaad या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तर तुम्ही Matar Cutlet हा कुरकुरीत नाष्टा संध्याकाळी किंवा सकाळसाठी बनवू शकता आणि शाळेच्या मुलांबरोबर ऑफिसला जाणाऱ्या मंडळींच्या डब्यात सुद्धा देऊ शकता.

मटारचे आरोग्यदायी फायदे –

मटारमध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे शरीरातील कॉलेस्ट्रॉलची मात्रा कमी ठेवण्यास मदत होते. म्हणून वजन नियंत्रण ठेवण्यासाठी मटार खावेत. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मटारचे सूप प्यायल्यास रक्तदाबाचा त्रास कमी होतो. तसेच बध्दकोष्ठतेच्या त्रासावरही मटार फायदेशीर आहे. कारण मटारमध्ये फायबरची मात्रा अधिक असते

Story img Loader