जेव्हा येतो भाजी बनवायचा कंटाळा, नकोसे वाटते वांग,बटाटा,काकडी अन मुळा..खावंसं वाटत काही झटकन होणारे आणि हलकं फुलकं, तेव्हा जरूर बनवून पहा “खानदेशी पद्धतीने मटार घेवडा सुकी भाजी ”..चला तर पाहुयात, भाजी बनवायचा कंटाळा आला तर ५ मिनिटांत बनवा खानदेशी पद्धतीने करा मटार घेवडा सुकी भाजी ..
मटार घेवडा सुकी भाजी साहित्य
- २५० ग्राम घेवडा
- १२५ ग्राम हिरवा मटार
- २ कांदे
- २ टोमॅटो
- २ चमचे लाल तिखट
- २ चमचे सब्जी मसाला
- १ चमचा हळद
- चवीपुरते मीठ
- ४ चमचे तेल
- अख्खा लसूण २ पाकळ्या
मटार घेवडा सुकी भाजी कृती
स्टेप १
घेवडा स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्यावा.कांदे टोमॅटो बारीक चिरून घ्यावे.
स्टेप २
गॅसवर एका भांड्यात तेल गरम करून त्यात कांदा टोमॅटो तळून घ्यावेत.
स्टेप ३
त्यामध्ये दिलेलं साहित्य घालून घेवडा आणि मटार परतून घ्यावे.
स्टेप ४
झाकणावर थोडे पाणी ठेवून भाजी मध्ये घालून मंद आचेवर भाजी शिजू द्यावी.
हेही वाचा >> Makar Sankranti 2024 : या पारंपारिक पदार्थाशिवाय साजरीच होऊ शकणार नाही मकरसंक्रांत! जाणून घ्या सोपी रेसिपी
स्टेप ५
मस्त चमचमीत घेवडा मटार सुकी भाजी तयार.पोळी किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करावी.