Matar Kachori Recipe in Marathi: दररोज नवनवीन पदार्थ कोणते करायचे, असा प्रश्न पडतो. अनेकदा कुरकुरीत खाण्याचीदेखील इच्छा होते. मग कचोरी, शेवपूरी खाऊनही कंटाळा येतो. म्हणूनच आज आपण ‘मटार कचोरी’ रेसिपी ट्राय करणार आहोत.

साहित्य

१-२ कप मटारचे दाणे

४-५ हिरव्या मिरच्या

कोथिंबीर

१ इंच आले

१-२ टेबलस्पून बडिशेपची भरड

१-२ टीस्पून जीरे पावडर

१-४ टीस्पून हिंग

चवीप्रमाणे मीठ

२-३ चिमूटभर साखर

१ टेबलस्पून तेल

१-२ कप गव्हाचे पीठ

कृती

मिक्सरच्या भांड्यात मटारचे दाणे, हिरव्या मिरच्या व आलं यांचे तुकडे करून घाला. त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या.

गॅसवर पॅन गरम करत ठेवायचं. त्यात तेल घाला. तेल तापले की हिंग घालायचं. वाटलेल्या मटारचे सारण घालून परता.

मिश्रण थोडेसे कोरडे होत आली की, त्यात बडीशेप ची भरड व जीरे पावडर घालून मिक्स करा. चवीप्रमाणे मीठ व साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.

मिश्रण कोरडे झाले की, गॅस बंद करा. मिश्रण एका बाऊलमध्ये काढा व थंड करायला ठेवा. एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ व मैदा एकत्र करून घेणे. चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करा.

तेलाचे मोहन घालून, सर्व पिठाला व्यवस्थित चोळून घ्या. पिठाची मूठ तयार झाली पाहिजे. तेल कमी पडल्यास थोडे घाला. थोडे थोडे पाणी घालून नेहेमीप्रमाणे कणिक मळून घेणे.५ मिनिटे झाकून ठेवा.

कणिक एकदा मळून घेणे.त्याचे छोटे छोटे गोळे करून घ्या. मटार मिश्रणाचे पण गोळे करून घ्या. एक गोळा घेऊन त्याची पारी करून घ्या. त्यात सारणाचा एक घालून पारी व्यवस्थित बंद करून चपटा गोळा करा. असे सर्व गोळे करून घ्या.

गॅसवर कढईत तेल घालून गरम करत ठेवा. पोळपाटाला तेलाचा हात लावून घ्या. गोळा त्यावर ठेवून, लाटण्याने हलक्या हाताने लाटून घ्या. अशाप्रकारे सर्व कचोऱ्या करून घ्या. तेल तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवा. एक किंवा दोन कचोऱ्या घालून घ्या. त्यावर झाऱ्याने तेल उडवा. म्हणजे कचोरी फुगते.

दोन्ही बाजूंनी छान तळून घ्या .अशाप्रकारे सर्व कचोऱ्या तळून घ्या. खाण्यासाठी तयार गरमागरम मटार कचोरी.

Story img Loader