Medu Vada Recipe : मेदूवडा हा असा पदार्थ आहे जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. तुम्हाला सुद्धा मेदूवडा आवडतो का? जर हो तर तुमच्यासाठी आम्ही मेदूवड्याची खास रेसिपी आहे. या रेसिपीच्या मदतीने तुम्ही फक्त १५ मिनिटांमध्ये मेदूवडा बनवू शकता? तुम्हाला वाटेल, हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. डाळ न भिजवता फक्त १५ मिनिटांमध्ये तुम्ही कुरकुरीत मेदुवडा बनवू शकता. रवा आणि पोहेपासून तुम्ही हा मेदूवडा बनवू शकता. हा मेदूवडा कसा बनवायचा, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा. या व्हिडीओमध्ये झटपट मेदूवडा कसा बनवायचा, हे सांगितले आहेत.
ashwinisrecipe या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये मेदूवडा बनवण्याचे साहित्य सांगितले आहेत,
- १/४ कप पोहे
- १ कप बारीक रवा
- मीठ
- १ कप दही
- १ उकळलेले बटाटे
- बारीक चिरलेला कांदा
- बारीक चिरलेली हिरवी मिरची
- बारीक चिरलेला कढीपत्ता
- कोथिंबीर
- आलं
- हिंग
- चिमूटभर खाण्याचा सोडा
- तळण्यासाठी तेल
हेही वाचा : Mango Sheera : यंदा मऊसुत आंब्याचा शिरा खाल्ला का? लगेच ही सोपी रेसिपी नोट करा, पाहा VIDEO
पाहा व्हायरल व्हिडीओ
या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
- १/४ कप पोहे घ्या आणि मिक्सरमधून बारीक करा.
- यामध्ये कप बारीक रवा टाका.
- त्यानंतर त्याच चवीनुसार मीठ घालायचे.
- त्यानंतर त्यात एक कप दही घालून पाणी न वापरता घट्ट असा गोळा तयार करून घ्या.
- त्यानंतर त्यावर झाकण ठेवून पाच मिनिटे ठेवा.
- पाच मिनिटानंतर या पिठामध्ये मध्यम आकाराचा उकळलेला बटाटा घाला आणि चांगला एकत्रित करा.
- त्यांतर त्यात बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची टाका.
- आलं, कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून टाका.
- त्यावर थोडं हिंग आणि चिमुटभर खाण्याचा सोडा टाका.
- सर्व मिश्रण एकत्र करा आणि या घट्ट पीठाचे वडे तयार करा.
- त्यानंतर हे वडे कढईत तेल गरम करून मध्यम आचेवर तळून घ्यायचे.
- असे झटपट मेदूवडे तयार होईल.
- हे मेदूवडे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.
हेही वाचा : हॉटेलसारखी चमचमीत, झणझणीत हैद्राबादी मिक्स व्हेज मसाला करी रेसिपी; घरच्या घरी नक्की ट्राय करा सोपी रेसिपी
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. एका युजरने लिहिलेय, “मी आज बनवले होते. खूप छान झाले होते.” तर एका युजरने लिहिलेय, “मस्तच वडे” आणखी एका युजरने लिहिलेय, “खूपच छान. सोपे करून सांगता”