मेथी पराठा हा पाहता क्षणी तोंडाला पाणी सुटणा-या काही पदार्थांपैकी एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थ! मेथी पराठा मेथीच्या भाजीची काही पाने, गव्हाचं पीठ, हिरव्या मिरच्या, दही इतक्या कमी सामग्रीमध्ये बनणारी सोपी पाककृती आहे. तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट तसंच हेल्दी रेसिपीचा ऑप्शन शोधत असाल तर मेथीचा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. ब्रेकफास्ट शिवाय मेथीचा पराठा तुम्ही डब्यातही पॅक करून मुलांना किंवा घरातील इतर सदस्यांना देऊ शकता, पण आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत खास मेथी गाजर पराठे, चला तर याची सोपी मराठी रेसिपी पाहुयात.
मेथी गाजर पराठे साहित्य
१-१/२ कप कणीक
२ टेबलस्पून बेसन
१ कप बारीक चिरून मेथी
२/३ कप गाजराचा किस
२ टीस्पून तिळ
१ टीस्पून ओवा
१ टीस्पून हळद
२ टीस्पून तिखट
१ टीस्पून
१ टीस्पून मॅगी मॅजिक मसाला
चवीनुसार मीठ
तेल आवश्यकतेनुसार
कुकिंग सूचना
मेथी गाजर पराठे कृती
१. सुरुवातीला मेथी स्वच्छ धुऊन घ्यावी. आणि बारीक चिरून घ्यावी. त्याचप्रमाणे गाजर किसून घ्यावे. एका बाऊलमध्ये कणिक आणि बेसन घ्यावे.
२. आता त्यात चिरलेली मेथी आणि गाजर टाकावे. त्याचप्रमाणे तीळ, ओवा, हळद, तिखट, मीठ, धणेपूड आणि मॅगी मसाला टाकावा.
३. हाताने छान मिक्स करून घ्यावे. त्यानंतर थोड्या थोड्या पाण्याने कणिक भिजवून घ्यावी. तेल लावून कणिक दहा-पंधरा मिनिटे बाजूला झाकून ठेवा वी.
४. दहा पंधरा मिनिटांनी कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घ्यावी. आता त्या कणकेचा गोळा घेऊन त्याचा पराठा लाटून घ्यावा. तव्यावर तेल टाकून चांगला भाजून घ्यावा दोन्ही बाजूंनी.
हेही वाचा >> उन्हाळ्यात तुम्हाला थंड ठेवेल “मोहब्बत का शरबत” नोट करा रिफ्रेशिंग मराठी रेसिपी
५. अशा प्रकारे सर्व पराठे तयार करून घ्यावे आणि चटणी लोणचे आणि कांद्यासोबत गरमागरम सर्व्ह करावे.