Methi Mathri Recipe : मेथी मठरी (Methi Mathri) हे अतिशय एक लोकप्रिय स्नॅक आहे जे मेथीपासून तयार केले जाते. लहान मुलांना कधी दुपारी किंवा सायंकाळी भूक लागते. तेव्हा तुम्ही त्यांना ही मेथी मठरी खायला देऊ शकता. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही मुलांसाठी ही खास रेसिपी बनवू शकता. या पौष्टिक मेथी मठरीची चव अप्रतिम असते. तुम्ही जर हा पदार्थ एकदा बनवून खाल तर तुम्हाला परत परत खाण्याची इच्छा होईल. आता तुम्हाला प्रश्न पडल असेल की हा पदार्थ कसा बनवायचा, आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
युट्युबवर एका व्हिडीओमध्ये या पदार्थाची अगदी सोप्या शब्दांमध्ये रेसिपी सांगितली आहे.

साहित्य

मेथीचे पाने
तूप
गव्हाचे पीठ
रवा
बेसन
तीळ
हळद
लाल पावडर
तेल
मक्याचे पीठ

कृती

ताजी मेथीचे पाने निवडून स्वच्छ धुवून घ्या.
त्यानंतर या मेथीच्या पानांना चांगले बारीक करा
गॅसवर कढई ठेवा. त्यात एक चमचा तूप गरम करा.
त्यात मेथीचे पाने टाका आणि तीन मिनिटे चांगल्याने परतून घ्या.
एका पातेल्यात अर्धा कप गव्हाचे पीठ टाका
एक चमचा जिरे टाका
दोन चमचे बेसन टाका
दोन चमचे रवा टाका
एक चमचा तीळ टाका
एक चमचा हळद टाका
एक चमचा लाल पावडर टाका
एक चमचा तेल टाका.
त्यानंतर त्यात परतून घेतलेली मेथी टाका.
थोडे मीठ टाकून मिश्रण एकत्र करा आणि पीठ मळून घ्या.
एका भांड्यामध्ये तीन चमचे मक्याचे पीठ घ्या आणि त्यात दोन चमचे तूप टाका
मिश्रण एकजीव करा
मळलेल्या पीठाची जाडसर पोळी लाटून घ्या.
पोळी लाटल्यानंतर त्यावर मक्याच्या पीठाचे मिश्रण लावा. त्यानंतर पोळी दोन्ही बाजूने फोल्ड करा व पुन्हा मक्याच्या पीठाचे मिश्रण लावा त्यानंतर वरील व खालील बाजू फोल्ड करा. पोळीचा आकार चौकोनी होईल.
त्यांतर पोळी आयातीकृती लाटून घ्या. आणि त्यावर पुन्हा मक्याच्या पीठाचे मिश्रण लावा त्यानंतर पोळी पुन्हा दोन्ही बाजूने फोल्ड करा एक लांब छडी सारखा आकार होईल. त्यानंतर चाकूने लांब वड्या पाडा.
या वड्या नीट गरम तेलातून मंद आचेवर तळून घ्या
मेथी मठरी तयार होईल.
व्यवस्थित माहिती व रेसिपी जाणून घेण्यासाठी खालील व्हिडीओ पाहा

Cook eat up! या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मेथी मठरी, एक ते दोन महिने टिकणारी मेथी मठरी”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना ही रेसिपी खूप आवडली आहे.