Methi Pakoda Recipe : हिवाळा म्हणजे थंडीचा ऋतू. या थंडीच्या दिवसांमध्ये गरमा गरम खायची इच्छा होते.अशात अनेकदा आपण बटाटा भजी किंवा कांदा भजी करुन खातो पण तुम्ही हिवाळ्यात पौष्टिक मेथी पकोडे सुद्धा करू शकता. कुरकुरीत गरमा गरम मेथी पकोड्यांची चव इतकी स्वादिष्ट असते की जिभेवर रेंगाळत असते. हे मेथी पकोडे कसे बनवायचे, जाणून घेऊ या.
साहित्य
- मेथीची पाने
- चिरलेला कांदा
- बेसन
- मिरचे आणि लसणाचा ठेचा
- ओवा
- धनेपूड
- गरम मसाला
- खाण्याचा सोडा
- मीठ
- हळद
- हिंग
- लिंबाचा रस
- कोंथिबिर
हेही वाचा : हिवाळ्यात बनवला जाणारा पौष्टिक तुरीच्या दाण्याचा झुणका! विदर्भ स्पेशल रेसिपी लगेच नोट करा
कृती
- मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरुन घ्या.
- त्यात कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबिर टाका.
- धनेपूड, खाण्याचा सोडा, गरम मसाला, ओवा, हळद, मिरचे आणि लसणाचा ठेचा, हिंग आणि चवीनुसार मीठ टाका.
- त्यावर लिंबाचा रस टाका
- त्यानंतर प्रमाणानुसार त्यात बेसन टाका आणि चांगले एकत्रित करा.
- त्यात थोडे पाणी घालून पकोड्यांचे मिश्रण बनवा.
- गॅसवर तेल गरम करा.
- गरम तेलातून पकोडे तळून घ्यावे.
- ही गरमा गरम पकोडे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाऊ शकता.