Viral Video : सध्या हिवाळा सुरू आहे. बाजारात हिरव्या पालेभाज्या आलेल्या आहेत. हिवाळ्यात पालक, मेथी इत्यादी पालेभाज्यांपासून अनेक पदार्थ बनवले जातात. अनेकांना मेथीची भाजी आवडते. लहान मुले मेथीची भाजी खाणे टाळतात. तेव्हा लहान मुलांना आवडेल अशी तुम्ही मेथीची रेसिपी तयार करू शकता. तुम्ही कधी मेथीची पुरी खाल्ली आहे का? चवीला अप्रतिम वाटणारी अशी मेथीची पुरी बनवायला सुद्धा अगदी सोपी आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मेथीची पुरी कशी बनवायची? तर टेन्शन घेऊ नका सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मेथीची पुरी कशी तयार करायची, याविषयी सांगितले आहे. (methi puri recipe how to make Crispy Methi puri watch viral video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
साहित्य
- मेथी
- तेल
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- आलं
- लसूण
- बडीशेप
- ओवा
- जिरे
- हळद
- धनेपूड
- लाल तिखट
- मीठ
- दही
- गव्हाचे पीठ
- बेसन
- तूप
- पाणी
हेही वाचा : Raw Banana Fry : वरण-भाताबरोबर खायला कच्या केळीचे करा तिखट काप; १० मिनिटात होणारी सोपी रेसिपी नक्की वाचा
कृती
- सुरुवातीला मेथी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या
- त्यानंतर बारीक चिरून घ्या.
- गॅसवर कढई ठेवा. त्यात तेल गरम करा.
- त्यात मेथी हलकीशी परतून घ्या.
- हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूणची एकत्र पेस्ट तयार करा.
- त्यानंतर एका प्लेटमध्ये परतून घेतलेली मेथी, पेस्ट, बडीशेप, जिरे, हळद, धनेपूड, ओवा, लाल तिखट, मीठ, थोडे दही सर्व एकत्र करा.
- त्यात गव्हाचे पीठ, बेसन पीठ आणि एक चमचा तूप टाकून नीट पाण्याने मळून घ्या.
- १५ मिनिटे मळलेले पीठ झाकून ठेवा.
- या पीठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्या
- गॅसवर कढई ठेवा. तेल गरम करा.
- गरम तेलातून मंद आचेवर या पुऱ्या तळून घ्या.
- कुरकुरीत मेथीच्या पुऱ्या तयार होतील.
या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही हिवाळ्यात टम्म फुगलेली कुरकुरीत मेथीची पुरी तयार करू शकता आणि गरमागरम पुरीचा चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर आस्वाद घेऊ शकता.
पाहा व्हिडीओ (Watch Viral Video)
sonamrananaware या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. सोशल मीडियावर हटके आणि वेगवेगळ्या रेसिपीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.